करमाळा : तरटगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी निर्मला वाळुंजकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. मंगळवारी (ता. १९) तरटगाव ग्रामपंचायत कार्यालयात ही निवड झाली. निवडीनंतर कार्यालयात त्यांचा सत्कार करण्यात आला आहे. सरपंच डॉ. अमोल घाडगे यांच्या नेतृत्वाखाली ही निवड बिनविरोध झाली आहे.उपसरपंचपदी निवड झालेल्या वाळुंजकर या माजी उपसरपंच अरुण वाळुंजकर यांचीच्या सून व तंटामुक्त समितीचे अध्यक्ष भाजपचे तालुका चिटणीस किरण वाळुंजकर यांच्या पत्नी आहेत. उपसरपंच वाळुंजकर या जिजामाता बचत गटाच्या अध्यक्षही आहेत. वर्षा नलवडे यांनी राजीनामा दिल्याने उपसरपंच पद रिक्त झाले. त्यानंतर सरपंच डॉ. घाडगे यांच्या नेतृत्वाखालीहि निवड बिनविरोध झाली. माजी उपसरपंच नलवडे यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य यावेळी उपस्थित होते.निवडीनंतर नवनियुक्त उपसरपंच वाळुंजकर यांचा सत्कार सुरेखा नानासाहेब घाडगे यांनी व उपस्थित महिला सदस्यांनी केला. निवडणूक अधिकारी म्हणून ग्रामसेवक अजित देवकर यांनी काम पाहिले.
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील ज्ञानसेवा सोशल फाउंडेशन संचलित ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा यांच्या ४ थ्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील उद्योजक क्लासिक कंपनीचे मालक अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचे करमाळा…
करमाळा प्रतिनिधी निमगाव (ह) येथे बुधराणी हॉस्पिटल पुणे व आधार बहु. उद्दे. संस्था, व कर्मवीर…