करमाळा प्रतिनिधी सोलापुर शिवसेना संपर्क प्रमुख अनिल कोकीळ यांच्या मार्गदर्शनाखालीशिवसेना जिल्हाप्रमुख धनंजय डिकोळे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना संपर्क कार्यालयात झालेल्या शिवसैनिकांच्या बैठकीत करमाळा तालुक्यातील शिवसैनिकांनी एकमुखी उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी ठाम राहण्याचा ठराव केला.या बैठकीत सोलापूर जिल्ह्यातील शिंदे गटासोबत गेलेले गद्दार आमदार शहाजी पाटील शिवसेना संपर्क प्रमुख तानाजी सावंत यांचा जिल्हाप्रमुख धनंजय डिकोळे यांनी तिव्र शब्दात निषेध केला. एकनाथ शिंदे यांनी पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी ठेवलेल्या विश्वासाचा घात करून पक्ष प्रमुख ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खुपसून मोठे पाप केले असुन यापुढे शिवसैनिक त्यांना जागा दाखवून देतील असा हल्लाबोल केला.
या बैठकीस तालुका संपर्क प्रमुख बापु मोरे, तालुकाप्रमुख सुधाकर लावंड, विधान सभा संघटक संजय शिंदे, शहर प्रमुख प्रवीण कटारिया ,युवा सेना तालुकाप्रमुख शंभुराजे फरतडे , शिवसेना उपतालुकाप्रमुख श्रिहरी तळेकर, बंडु शिंदे ,प्रमोद वागज, भिवा शेजाळ, उपशहरप्रमुख पंकज परदेशी, संजय भालेराव, लालु कुरेशी
केम शहर प्रमुख नवनाथ खानट, नवनाथ देवकर, विभाग प्रमुख विश्वास काळे, नवनाथ सुर्यवंशी, जेष्ठ शिवसैनिक दिलीप गानबोटे उपस्थित होते.
या वेळेस अधिक बोलताना डिकोळे म्हणाले की आजपर्यंत पक्षात अनेक बंड झाले, भुजबळ, राणे राज ठाकरे सोडून गेले परंतु शिवसैनिकांनी भगव्याचे तेज कमी होवु दिले नाही.आजचे बंड हे फक्त पक्ष सोडण्यापुर्ते मर्यादित नसून एकनाथ शिंदे यांना हताशी धरून शिवसेना व ठाकरे परिवार संपवण्याचा डाव आहे.त्यामुळेच शिवसैनिकांनी कोणत्याही अमिषाला बळी न पडता पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी ठाम राहण्याची गरज आहे.ज्या काही कायदेशीर प्रकिया सुरु आहेत या मध्ये शिवसनेचा विजय निश्चित असून आगामी या अग्निदिव्यातून शिवसेना व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व उजाळुन निघेल असा विश्वास व्यक्त केला.यावेळी नुतन शहर प्रमुख प्रवीण कटारिया, बापु मोरे, युवा सेना तालुकाप्रमुख शंभुराजे फरतडे, गोरख ताकमोगे यांनी मनोगत व्यक्त केले.
करमाळा प्रतिनिधी भागवत कथाही कल्पवृक्षासारखी असून कलियुगात देवाला प्रत्यक्ष पाहण्याची ताकद मानव जीवनाचे सार्थक करण्याची…
करमाळा प्रतिनिधी पाठवा :- दिवंगत भाजपा नेते, भारताचे माजी पंतप्रधान तथा भारतरत्न स्व. अटलबिहारी वाजपेयी…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यात गेली काही दिवसांपासून उजनी जलाशय व सीना नदीतून अवैधरित्या उपसा सुरू…
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील ज्ञानसेवा सोशल फाउंडेशन संचलित ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा यांच्या ४ थ्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…