करमाळा शिवसेना शहरप्रमुखपदी प्रविण कटारिया यांची निवड

 

करमाळा प्रतिनिधी जय महाराष्ट्र मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष प्रविण कटारिया यांची करमाळा शहरप्रमुख म्हणुन नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून शिवसेनेचे सचिव विनायक राऊत यांनी पत्रकाव्दारे ही माहिती दिली आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या आदेशाने सोलापूर जिल्ह्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत.
याबाबतचे वृत्त शिवसेनेचे मुखपृष्ठ असलेल्या सामना मध्ये प्रसिध्द करण्यात आले आहे. करमाळा शहर प्रमुख पदाची जागा गेल्या अडीच वर्षापासून रिक्त होती. या पदासाठी अनेकजणांची रस्सीखेच चालू होती. यामध्ये कटारिया यांनी बाजी मारली आहे. प्रवीण कटारिया यांनी शहरप्रमुख पदावर अनेक वर्षे काम केले आहे. त्यांच्या कामाचा अनुभव पाहता शिवसेना पक्षाचे निष्ठेने काम केल्यामुळे पक्षाने त्यांचेवर पुन्हा एकदा शहरप्रमुख पदाची जबाबदारी टाकली आहे. त्यानूसार करमाळा शहर प्रमुख म्हणून प्रविण कटारिया यांची नियुक्ती झाली आहे. त्यांच्या निवडीचे स्वागत शिवसैनिकांनी केले असून त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.                                                       शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी टाकलेली शहरप्रमुख पदाची जबाबदारी उत्तमरितीने पार पाडून शहरात वॉर्डनिहाय शिवसेनेच्या शाखा काढण्याचे नियोजन करून घर तेथे शिवसेना हे अभियानही राबविले जाईल. शहरात शिवसेनेचा मानणारा मोठा मतदार वर्ग आहे. शहरात संवाद मेळावा आयोजित करून नागरीकांच्या समस्या अडीअडचणी सोडविण्यासाठी शिवसेने मार्फत आंदोलन करून त्या सोडविण्याचा प्रयत्न केला जाईल.…प्रविण कटारिया शहरप्रमुख शिवसेना

saptahikpawanputra

Recent Posts

यशवंत शिंदे यांची नेमबाजी स्पर्धेत सुवर्णपदकाला गवसणी! ४१ व्या महाराष्ट्र राज्य नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदकमाढा तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा

करमाळा प्रतिनिधी  निमगाव (टें.) येथील आदर्श सरपंच तथा विठ्ठल कॉर्पोरेशनचे कार्यकारी संचालक श्री. यशवंत संजयमामा…

2 hours ago

प्राचार्य बाळासाहेब नरारे यांना पुरी (ओडिशा) येथे ‘सुकुमारी स्वरमनी’ पुरस्काराने सन्मानित

करमाळा प्रतिनिधी करमाळा  येथील कमलाभवानी बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष तथा सुरताल संगीत विद्यालयाचे प्राचार्य श्री. बाळासाहेब…

8 hours ago

करमाळा शहरातील दगडी रोड येथील रहिवासी शारदा पिसे दुःखद निधन

करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील दगडी रोड येथील रहिवासी शारदा सुरेश पिसे (वय ७१) यांचे अल्पशा…

1 day ago

लोकशाही बचाव अराजकता हटाव सोलापूरच्या भाजप मोर्चाच्या नियोजनासाठी भाजप जिल्हा युवा नेते दिग्विजय बागल यांच्या उपस्थितीत करमाळ्यात १ नोव्हेंबरला बैठक- सचिन पिसाळ

करमाळा प्रतिनिधी काँग्रेस इंडी आघाडी आणि डाव्या पक्षांकडून भारतीय जनता पक्षाविरोधात खोटा प्रचार करून पक्षाची…

6 days ago

दुष्काळ व पाणीटंचाई संदर्भातील बैठक आमदार.नारायण (आबा)पाटील यांनी जेऊर येथे न घेता करमाळा येथे पंचायत समिती सभागृहात घ्यावी- ॲड. अजिनाथ विघ्ने उपसभापती पं.स.करमाळा

करमाळा प्रतिनिधी  करमाळा तालुक्याची दुष्काळ निवारण व पाणीटंचाई आढावा बैठक आमदार. नारायण( आबा) पाटील यांचे…

1 week ago

डॉ अजिंक्य पवार यांची एम.डी. परीक्षेत यशस्वी भरारी; जनरल मेडिसिनमध्ये पदव्युत्तर पदवी संपादन डॉ. रविकिरण पवार कुटुंबीयांचा अभिमान उंचावला सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव

करमाळा : प्रतिनिधी मेहनत, जिद्द, सातत्यपूर्ण अभ्यास आणि ध्येयाप्रती असलेल्या निष्ठेच्या जोरावर डॉ. अजिंक्य रविकिरण…

1 week ago