करमाळा प्रतिनिधी आज देश हुकुमशाही पध्दतीच्या दिशेने जात असुन हे लोकशाहीला खुप घातक असल्याचे प्रतिपादन काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष प्रतापराव जगताप यांनी केले.ते मोरवड शाखेच्या उद्घाटनाच्या प्रसंगी बोलत होते.आज राज्याबरोबर देशाला काँग्रेस पक्षाची गरज असुन जातीयवादी पक्षाला रोखण्यासाठी स्व.इंदिराजी गांधी, राहुलजी गांधी,यांचे विचार समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहचवण्याची आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे.आज महागाईने ऊच्चांक गाठला असुन मध्यमवर्गीय माणुस कोलमडुन पडायला लागला आहे.शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी हे सरकार अनुकुल नसुन शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रु आणण्याचे काम हे सरकार चांगल्या पध्दतीने करत असल्याचा उपरोधात्मक टोलाही श्री जगताप यांनी लगावला.देशातील प्रत्येक राज्यात अडथळा आणण्याचे काम भा.ज.पा.सरकार करत असुन हे लोकशाहीला अत्यंत मारक आहे.त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत पुन्हा एकदा काँग्रेस पक्षाचे सरकार येणे हि काळाची गरज बनली आहे.यावेळी हनुमंत नाळे यांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढवुन शाखेचे उद्घाटन केले.यावेळी एन.यु.एस.आय चे तालुकाध्यक्ष समाधान काळे-पाटील माजी सरपंच नामदेव शिंदे,दादा कुदळे,केशव शिंदे,सुरज गुंजाळ,विशाल व्यवहारे,नाना दिवटे,पांडु आदलिंगे,संतोष आदलिंगे,रोहीत मोहोळकर,केशव नाळे,रविंद्र नाळे,महीबुज कबीर,अंगद कबीर,महेंद्र काळे,सुलतान कबीर,प्रविण नाळे,प्रविण काळे,मनोहर नाळे,संतोष काळे,रोहीत नाळे आदी उपस्थित होते.यावेळी उध्दव नाळे यांनी प्रास्ताविक केले.यावेळी मोरवड येथिल युवक वर्गाने आधुनिक व्यायाम शाळेची मागणी केली यावेळी तालुकाध्यक्ष प्रतापराव जगताप यांनी आपण निश्चितपणे प्रयत्नशिल राहील असे आश्वासित केले.
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील उद्योजक क्लासिक कंपनीचे मालक अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचे करमाळा…
करमाळा प्रतिनिधी निमगाव (ह) येथे बुधराणी हॉस्पिटल पुणे व आधार बहु. उद्दे. संस्था, व कर्मवीर…
करमाळा प्रतिनिधी छोटे छोटे भूखंड उपलब्ध व्हावे या मागणीसाठी आपण विशेष प्रयत्न केले असून उद्योग…