करमाळा प्रतिनिधी राज्याचे लोकप्रिय नेते व उपमुख्यमंत्री मा.श्री.देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा व्यापार आघाडी च्या वतीने आज शहरातील निराधार व्यक्तींना अन्नदान आणि पांजरपोळ गोरक्षण संस्था येथे चारा वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
शहरातील पांजरपोळ गोरक्षण संस्था येथील जनावरांसाठी जिल्हा उपाध्यक्ष किरण बोकन, तालुका अध्यक्ष गणेश चिवटे यांच्या चारा वाटप आणि शहराध्यक्ष जगदीश आगरवाल आणि बाळासाहेब कुंभार यांच्या हस्ते निराधार व्यक्तींना अन्नदान करण्यात आले.यावेळी तालुका सरचिटणीस अमरजित साळुंखे,रामा ढाणे,शाम सिंधी, जिल्हा किसान मोर्चा चे लक्ष्मण केकान,तालुका किसान मोर्चा चे विजय नागवडे,माजी तालुका अध्यक्ष संजय घोरपडे,संजय गांधी निराधार चे नरेंद्र ठाकूर,सहकार आघाडीचे सचिन चव्हाण,महिला मोर्चा अध्यक्षा संगीता नष्टे,शहर वाहतूक चे सचिन पांढरे,संजय जमदाडे,गणेश वाशिंबेकर,मनोज कुलकर्णी,पांजरापोळ संस्थेचे अध्यक्ष भरत गांधी,जकिर भाई,महादेव गोसावी,अजित जागते इत्यादी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार भाजपा व्यापार आघाडी चे शहराध्यक्ष जितेश कटारिया यांनी मानले.
करमाळा प्रतिनिधी काँग्रेस इंडी आघाडी आणि डाव्या पक्षांकडून भारतीय जनता पक्षाविरोधात खोटा प्रचार करून पक्षाची…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्याची दुष्काळ निवारण व पाणीटंचाई आढावा बैठक आमदार. नारायण( आबा) पाटील यांचे…
करमाळा : प्रतिनिधी मेहनत, जिद्द, सातत्यपूर्ण अभ्यास आणि ध्येयाप्रती असलेल्या निष्ठेच्या जोरावर डॉ. अजिंक्य रविकिरण…
करमाळा प्रतिनिधी उजनी धरणावर प्रस्तावित तरंगता सौर ऊर्जा प्रकल्प, ग्रीन हायड्रोजन प्रकल्प, एआय डेटा…
करमाळा, प्रतिनिधी : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा यांचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. महेश मच्छिंद्र…
करमाळा प्रतिनिधी अखिल भारतीय क्षत्रिय महासभा या संघटनेच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी करमाळा येथील नरेंद्रसिंह ठाकुर यांची…