करमाळा प्रतिनिधी शासकीय यंत्रणांचा गैरवापर करुन काँग्रेस पक्षाच्या सर्वेसर्वा श्रीमती सोनियाजी गांधी यांना काल दिवसभर ई.डी.च्या चौकशीसाठी बोलवण्यात आले हा अतिशय निंदणीय प्रकार असल्याचे प्रतिपादन तालुकाध्यक्ष प्रतापराव जगताप यांनी कुगाव ता.करमाळा येथे केले ते शाखा ऊद्घाटनाच्या निमित्ताने बोलत होते.पुढे बोलताना श्री जगताप म्हणाले ई.डी. कार्यालयाचा चुकीचा वापर संपुर्ण देशामध्ये चालला असुन याचा जाहीर निषेध आम्ही काळी फित लावुन घोषणा देऊन करत आहोत.देशामध्ये अनेक गोष्टींवर चर्चा करण्यासारखे विषय असताना देशातील जनतेचा जाहीरपणे आवाज दाबुन अहंकारी व हुकुमशाही पध्दतीने भा.ज.पा.सरकार काम करत आहे.परंतु यात शेवटी सत्याचाच विजय होणार आहे.खरतर जी.एस टी, महागाई,अग्निपथ योजनेवर चर्चा करायला भा.ज.पा.सरकार जाणिवपुर्वक दुर्लक्ष करत आहे.त्यामुळे आपल्या पक्षाची ताकत वाढवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत असे आवाहन शेवटी श्री.जगताप यांनी केले.सुरुवातीला सुभाष पोरे यांच्या हस्ते नारळ फोडण्यात आला. तसेच यावेळी गुणवंत विद्यार्थी आत्ताब सय्यद याचा एटीएस मध्ये क्रमांक आल्याबद्दल तसेच पैलवान अविनाश भोसले याचा गावातील कुस्ती मैदानात प्रथम क्रमांक आल्याबद्दल सत्कार करण्यात आला. गावातील हनुमान मंदीरात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी श्री. बल्लाळ सर,सचिन काळे,तालुका काँग्रेसचे सचिव जैन्नुद्दिन शेख,जिल्हा काँग्रेसचे ओ.बी.सी. विभागाचे उपाध्यक्ष अशोक वाघमोडे यांनी आपली मनोगत व्यक्त केली.गावातील विद्यार्थ्यांना शाळेला येण्या-जाण्या साठी निर्माण झालेला एस.टी.चा मोठा प्रश्न सोडवल्या बद्दल अतुल मारकड यांचा सत्कार श्री.जगताप यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सरपंच संदिपान कामटे ,ग्रा.स.अर्जुन अवघडे, प्रकाश डोंगरे अवघडे,ग्रामपंचायतीचे मा.स.सागर पोरे,ज्ञानदेव ओहोळ,सचिन गायकवाड, संतोष पोरे,मा.उपसरपंच इन्नुस सय्यद, मा.सदस्य दत्तात्रय गाडे,भगवान कांबळे,दादा अवघडे,RPI मातंग आघाडी अध्यक्ष हनूमंत अवघडे, सोसायटी सदस्य हरिश्चंद्र कामटे,युवराज कामटे,RPI चे युवराज ओहोळ,चिखलठाणचे अनिकेत पाटील,बाळु पाटील,पोलीस पाटील जालिंदर हराळे,आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन महादेव अवघडे यांनी केले तर आभार तालुका सचिव जैनुदीन शेख यांनी मांडले.
करमाळा प्रतिनिधी भागवत कथाही कल्पवृक्षासारखी असून कलियुगात देवाला प्रत्यक्ष पाहण्याची ताकद मानव जीवनाचे सार्थक करण्याची…
करमाळा प्रतिनिधी पाठवा :- दिवंगत भाजपा नेते, भारताचे माजी पंतप्रधान तथा भारतरत्न स्व. अटलबिहारी वाजपेयी…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यात गेली काही दिवसांपासून उजनी जलाशय व सीना नदीतून अवैधरित्या उपसा सुरू…
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील ज्ञानसेवा सोशल फाउंडेशन संचलित ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा यांच्या ४ थ्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…