जिल्हा परिषद पंचायत समिती आरक्षण सोडत 29 जुलै रोजी होणार.

करमाळा प्रतिनिधी राज्यातील १४ महानगरपालिका, २५ जिल्हा परिषद आणि त्याअंतर्गत येणाऱ्या २८४ पंचायत समित्यांमध्ये नव्याने आरक्षण सोडत होणार आहे. आज राज्य निवडणूक आयोगाने या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. यानुसार २९ जुलै रोजी सोडत होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणासह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याची परवानगी दिल्यानंतर आयोगाकडून याबाबतचा कार्यक्रम नव्याने जाहीर करण्यात आला आहे.
अमरावती, अकोला, सोलापूर, पुणे, नाशिक, पिंपरी-चिंचवड, औरंगाबाद, मालेगाव, वसई-विरार, भिवंडी येथे २७ टक्के आरक्षण ओबीसींसाठी राहील. आयोगाच्या आरक्षण सोडतीच्या आदेशान्वये सध्या अस्तित्वात असलेले सर्वसाधारण महिलांचे आरक्षण, नागरिकांचा इतर मागास प्रवर्ग आणि नागरिकांचा इतर मागास प्रवर्ग (महिला) या तीन विभागातील आरक्षण सोडत नव्याने करण्यात येणार आहे.
एससी आणि एसटी यांचे आरक्षण हे त्यांच्या लोकसंख्येनुसार झालेले असल्याने ते वगळून आता नव्याने सोडत निघणार आहे. ओबीसींसाठीचे आरक्षण असले तरी एससी आणि एसटी प्रभाग वगळून सर्वच प्रभाग या सोडतीत घेतले जाणार आहेत. त्यामुळे अनेक महापालिकांत पुन्हा नव्याने प्रभागांतील समीकरणे बदलणार आहे.
यापूर्वी राज्यात निवडणुका होणार असलेल्या १४ महापालिकांची आरक्षण सोडत ३१ मे रोजी जाहीर करण्यात आली होती. तर जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांसाठी १३ जुलै रोजी आरक्षण सोडत होणार होती. मात्र ती रद्द करण्यात आली होती. आता या सर्वच ठिकाणची आरक्षण सोडत २९ जुलै रोजी नव्याने करण्यात येणार आहे.

.

saptahikpawanputra

Recent Posts

ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांची तालुकास्तरीय स्पर्धेत दुहेरी बाजी बुद्धिबळात प्रतीक नामदे तर कुस्तीमध्ये राम सरडे प्रथम

  करमाळा प्रतिनिधी : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा येथील विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत…

16 hours ago

करमाळयात गणेशोत्सवानिमित्त सर्वोदय प्रतिष्ठानची तीन दिवसीय व्याख्यानमाला अरविंद जगताप, देवा झिंजाडे, प्रभाकर साळेगावकर यांची व्याख्याने; १९ ते २१ सप्टेंबरदरम्यान आयोजन

करमाळा : प्रतिनिधी गणेशोत्सवाच्या निमित्ताने करमाळ्यातील सर्वोदय प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही तीन दिवसीय बौद्धिक व्याख्यानमालेचे…

20 hours ago

दोन-तीन वाडे होते… पण स्वप्न मोठे होते; साखरे सरांनी घडविला राजुरीचा शैक्षणिक इतिहास! शिक्षकांच्या सामर्थ्यापुढे भव्य इमारतीही फिक्या; प्रा. डॉ. राजेंद्र दास

करमाळा : प्रतिनिधी राजुरीसारख्या ग्रामीण भागात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवताना स्व. सुखदेव साखरे सरांसमोर अनेक अडचणी…

21 hours ago

ग्लोबल सायन्स इन्स्टिटयूट च्या राम सरडे चा तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक*

*  करमाळा  प्रतिनिधी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळाचा विद्यार्थी राम धनंजय…

2 days ago

सणासुदीच्या काळात करमाळ्यातील सायंकाळचे भारनियमन रद्द करा -दिग्विजय बागल

करमाळा : प्रतिनिधी – करमाळा तालुक्यात पावसाळा सुरू झाल्यापासून समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने दुष्काळी परिस्थिती…

2 days ago