स्वर्गीय ज्ञानदेव जगन्नाथ भोईटे यांच्या स्मृतिदिनानिमित्त वाशिंबे येथे रक्तदान नेत्ररोग शिबीर संप्पन्न

करमाळा प्रतिनिधी  देशभक्त स्वर्गीय जगन्नाथ कृष्णाजी भोईटे चारिटेबल ट्रस्ट,वाशिंबे ता. करमाळा जि. सोलापूर यांच्यावतीने स्वर्गीय ज्ञानदेव जगन्नाथ भोईटे यांच्या स्मृतिदिनानिमित्त… नेत्र निदान शिबिर, भव्य रक्तदान शिबिर, 251वृक्षारोपण, वृद्ध लोकांना काटी वाटप, हिमोग्लोबिन चाचणी,शाळेतील मुलांना खाऊ वाटप कोविड योद्धांचा सन्मान.. असे विविध कार्यक्रम वाशिंबे जिल्हा परिषद शाळेमध्ये आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी करमाळा तालुक्याचे लोकनेते मा.आमदार नारायण आबा पाटील,नेते मा.श्री.नवनाथ बापू झोळ,यश कल्याणी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष या.श्री. गणेश भाऊ करे पाटील, दत्तकला शिक्षण संस्थेचे संस्थापक,अध्यक्ष.मा.श्री. रामदास झोळ सर,पांडुरंग सूर्यवंशी संपादक दैनिक कटू सत्य व वृत्तदर्पण न्यूज चैनल सोलापूर, हृदयरोग तज्ञ रोहन पाटील करमाळा, ह.भ.प.माऊली झोळ, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एस‌. बी.भोंडवे मॅडम,वैद्यकीय अधिकारी प्राथमिक केंद्र कोर्टी डॉ. हेमंत येवगे, लोकनियुक्त सरपंच सौ.मनिषाताई नवनाथ झोळ, उपसरपंच सौ.ज्योतीताई टापरे, स्वातीताई साळुंके,डॉ.संजय साळुंके ,डॉ. विक्रम नाळे, डॉ. सुदर्शन नवनाथ झोळ, यांच्या उपस्थित हा कार्यक्रम पार पडला. यावेळी नेत्र शिबिराचा 47 लोकांनी लाभ घेतला, त्याची हिमोग्लोबिन चाचणी 169 लोकांनी केली. व रक्तदान शिबिरात लोकांनी 155 रक्तदात्यांनी रक्तदान केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अमोल भोईटे,व भोईटे परिवार मित्र मंडळ यांचा सहभाग लाभला. या कार्यक्रमाचे नियोजन श्री सचिन भोईटे यांनी केले.

saptahikpawanputra

Recent Posts

ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांची तालुकास्तरीय स्पर्धेत दुहेरी बाजी बुद्धिबळात प्रतीक नामदे तर कुस्तीमध्ये राम सरडे प्रथम

  करमाळा प्रतिनिधी : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा येथील विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत…

17 hours ago

करमाळयात गणेशोत्सवानिमित्त सर्वोदय प्रतिष्ठानची तीन दिवसीय व्याख्यानमाला अरविंद जगताप, देवा झिंजाडे, प्रभाकर साळेगावकर यांची व्याख्याने; १९ ते २१ सप्टेंबरदरम्यान आयोजन

करमाळा : प्रतिनिधी गणेशोत्सवाच्या निमित्ताने करमाळ्यातील सर्वोदय प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही तीन दिवसीय बौद्धिक व्याख्यानमालेचे…

20 hours ago

दोन-तीन वाडे होते… पण स्वप्न मोठे होते; साखरे सरांनी घडविला राजुरीचा शैक्षणिक इतिहास! शिक्षकांच्या सामर्थ्यापुढे भव्य इमारतीही फिक्या; प्रा. डॉ. राजेंद्र दास

करमाळा : प्रतिनिधी राजुरीसारख्या ग्रामीण भागात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवताना स्व. सुखदेव साखरे सरांसमोर अनेक अडचणी…

22 hours ago

ग्लोबल सायन्स इन्स्टिटयूट च्या राम सरडे चा तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक*

*  करमाळा  प्रतिनिधी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळाचा विद्यार्थी राम धनंजय…

2 days ago

सणासुदीच्या काळात करमाळ्यातील सायंकाळचे भारनियमन रद्द करा -दिग्विजय बागल

करमाळा : प्रतिनिधी – करमाळा तालुक्यात पावसाळा सुरू झाल्यापासून समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने दुष्काळी परिस्थिती…

2 days ago