करमाळा( प्रतिनिधी)
हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंदजी दिघे यांच्या विचारावर चालत मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली करमाळा तालुक्यातील शिवसेना मजबूत असून जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे पंचायत समितीचे सभापती अतुल पाटील जिल्हा परिषदेचे सहा सदस्य पंचायत समितीचे आठ सदस्य अनेक ग्रामपंचायतीचे सरपंच सदस्य शेकडो पदाधिकारी व सच्चे निष्ठावंत शिवसैनिक एकनाथ शिंदे साहेबांबरोबर असून येणाऱ्या काळात करमाळा तालुक्याची नवीन शिवसेनेची कार्यकारणी जाहीर करणार असल्याची माहिती शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी दिली आहेशिवसेनेचे मुख्य नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आपला पाठिंबा असून त्या पद्धतीचे शपथ पत्र तयार करण्याचे कामास आज करमाळात सुरुवात करण्यात आलीयावेळी बोलताना महेश चिवटे म्हणाले की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यास इच्छुक असलेल्या प्रत्येक निष्ठावंत सैनिकाला पदाधिकारी बनवण्यात येणार असून करमाळा तालुक्यातील 118 गावात नवीन शिवसेनेच्या शाखेचे पुनर्बांधणी करण्यात येणार आहे
येणाऱ्या जिल्हा परिषद समिती पंचायत समिती नगरपालिका सह सहकार्यातल्या सर्व निवडणुका शिवसेनेचे माजी आमदार नारायण आबा पाटील यांच्या नेतृत्वाखाली सर्व शिवसैनिकांना एकत्रित घेऊन पुन्हा करमाळा तालुक्यावर भगवा झेंडा फडकवण्याचा निर्धार प्रत्येक शिवसैनिकांनी केला आहे
अमरनाथ टावर बिल्डिंग येथे लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे संपर्क कार्यालयाचे उद्घाटन शिवसेनेचे उपनेते तानाजी सावंत यांच्या हस्ते होणार असून प्रत्यक्ष सैनिकाला ताकद देण्याचे काम केले जाणार आहे करमाळा तालुक्यातील सर्व प्रकल्प विकास कामे यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मंत्रालयात बैठक घेण्यात येणार असून तालुक्यातील लोकांचे काही प्रश्न व निवेदन असतील तर ते त्यांनी शिवसेना वैद्यकीय मदत पक्षाच्या कार्यालयात जमा करावे असे आव्हान ही महेश चिवटे यांनी केले आहेयावेळी मार्केट कमिटीचे माजी संचालक देवानंद बागल कोळगाव संघर्ष समितीचे अध्यक्ष सतीश निळ युवा सेनेचे नेते राहुल कानगुडे शिवसेनेचे शहर प्रमुख संजय शीलवंत उपशहर प्रमुख राजेंद्र काळे दादा भोसले सय्यद पठाण विजय सुपेकर शाखाप्रमुख निलेश चव्हाण कोळगाव गटप्रमुख नागेश चेंडगे हिवरवाडी शाखाप्रमुख आजिनाथ इरकर उप तालुका प्रमुख राजेंद्र मिरगळ वैद्यकीय मदत पक्षाचे तालुका संपर्क दीपक पाटणे कुंभेजचे शाखाप्रमुख मारुती भोसले जेऊर शहर प्रमुख संजय जगताप झरे शाखाप्रमुख शिवम मोहिते शिवसेना महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष पुनम चेंडगे पाटील, महिला शहर प्रमुख सलीमा मुलानी शेलगावचे शाखाप्रमुख प्रदीप बनसोडे रंभापुरा शाखाप्रमुख केशव साळुंखे हिवरवाडी चे सरपंच बापू पवार आधी सह शिवसेनेचे शेकडो पदाधिकारी उपस्थित होते.
करमाळा प्रतिनिधी सध्याच्या धकाधकीच्या युगामध्ये पत्रकारानी आरोग्याची काळजी घेऊन वेळोवेळी तपासणी करून तणाव मुक्त…
करमाळा प्रतिनिधी लोकमंगल सहकारी पतसंस्थेने नागरिकांचे हित जपले असून पत्रकारांसाठी कल्याणकारी योजना राबवुन पत्रकारांना…
करमाळा प्रतिनिधी करमाळा नगरपरिषदेच्या. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या दहिगाव सबस्टेशन वर नवीन ट्रान्सफॉर्मर बसविण्यात यावा…
करमाळा प्रतिनिधी पत्रकार’ आणि ‘पोलीस एकाच नाण्याच्या दोन बाजू असून लोकशाही टिकवण्यासाठी पत्रकारांना पाठबळ द्यावे…
मुंबई /प्रतिनिधी देशभरातील माध्यमांतील पत्रकार व संपादक यांच्या न्याय हक्कांसाठी संपादक व जेष्ठ माध्यम तज्ञ…
करमाळा, प्रतिनिधी - राज्यभर व्याप्ती असलेल्या युवा भिम सेना या सामाजिक संघटनेच्या वतीने दिला जाणारा…