पांडुरंगाच्या एकादशीला भाविकांना अन्नदान करण्यासाठी झटणारा अवलिया सच्चा कार्यकर्ता – तेजस सुरवसे

करमाळा प्रतिनिधी करमाळा येथे कमलादेवी रोड बायपास चौक येथे दर एकादशीला वारकऱी व भाविक भक्ताना साबुदाणा खिचडी फळाचे वाटप करण्यात येते श्री देवीचामाळ येथील तेजेस सुरवसे या तरुण युवकांचे भाविकांना अन्नदान‌ करण्यासाठीचे कार्य अखंडपणे चालु आहे.निस्वार्थ भावनेतुन कुठलाही स्वार्थ भावना न ठेवता केवळ लोकांची सेवा करणे हाच उद्देश बाळगुन मानवता हाच खरा धर्म म्हणुन तेजेश सुरवसे काम करत आहे.मागिल काही वर्षापासुन खंडोबा मंदीर परिसरात वृक्षारोपण करून हजारो झाडे लावुन हा परिसर झाडांच्या लागवडीने हा परिसर बहरला असुन नंदनवन‌ करण्याचे काम केले आहे.या वृक्ष लागवड व त्याची जोपासणा करण्यासाठी श्री बाळासाहेब आबा देशमुख यांचे मार्गदर्शन लाभले आहे. सध्याच्या युगात प्रत्येकजण पैशाच्या नावाच्या मागे लागला असुन अशा परिस्थितीत आपल्या कुटुंबाचा विचार न करता निरपेक्षपणे समाजकार्याला स्वतःला वाहुन घेऊन समाजसेवेचे व्रत जपण्याचे कार्य नक्कीच कौतुकास्पद असुन समाजकार्य करणाऱ्यासाठी एक आदर्श घेण्यासारखे तेजस सुरवसे यांचे कार्य प्रेरणादायी आहे.एकादशीला फराळ खिचडी वाटपांचे अन्नदान करण्यासाठी माऊली देवस्थान ट्रस्टचे ह.भ.प. बाबासाहेब साबळे महाराज,ह.भ.प पांडुरंग तात्या सुर्यवंशी यांचे मार्गदर्शन लाभत असुन अन्नदानाचा हा जग्गनाथ रथ अखंडपणे चालु असुन या उपक्रमास ज्ञात अज्ञात दात्यांचे सहकार्य लाभले असुन त्यांच्या सहकार्यातुन हे कार्य चालु असल्याचे तेजेस सुरवसे यांनी सांगितले आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

योगासन स्पर्धेत कु. हरिश मंडलिक तालुक्यात प्रथम; नगरसेविका सौ. सुवर्णा रोहिदास आल्हाट यांच्या हस्ते सत्कार

* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…

2 days ago

कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाच्या वैभव सुरवसे ची विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

  करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…

3 days ago

उजनीच्या पाण्यावर १५ अब्ज युरोच्या एआय डेटा सेंटरची नजर! पाणी आरक्षणाला तात्काळ स्थगिती देण्याची खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांची मागणी

करमाळा  प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…

4 days ago

वाढदिवसाचा आनंद शाळेसाठी; कुलकर्णी परिवाराची पाच हजारांची देणगी मल्हारच्या वाढदिवसानिमित्त राजुरी जिल्हा परिषद शाळेला मदतीचा हात

करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…

4 days ago

नवलेखक-नवकवींसाठी रविवारी कार्यशाळा* समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळातर्फे आयोजन

सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…

5 days ago

मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा पूर्ववत करा रश्मी बागल यांची पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांना भ्रमण ध्वनि द्वारे विनंती

  करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…

5 days ago