राज्यातील सत्तांतरानंतरही आ. संजयमामा शिंदे गटातील इनकमिंग सुरूच… हिंगणी येथील बागल गटाच्या कार्यकर्त्यांचा आमदार शिंदे गटात जाहीर प्रवेश…


करमाळा प्रतिनिधी
मौजे -हिंगणी ता.करमाळा येथील बागल गटाच्या कार्यकर्त्यांनी  विठ्ठल कार्पोरेशन,म्हैसगांव येथे विकासप्रिय आमदार मा.संजयमामा शिंदे यांची भेट घेऊन शिंदे गटात अधिकृत प्रवेश केला. यावेळी पार्टी प्रमुख मा.बबनराव आण्णा जाधव (चेअरमन) यांच्या नेतृत्वाखाली मा.मधुकर जाधव (व्हा.चेअरमन), तसेच जाधव पार्टीचे सर्व कार्यकर्ते यांनी प्रवेश केला. यावेळी जिल्हा दूध संघाचे संचालक मा.अशोकबापू पाटील, ॲड.अजित विघ्ने,मा.तानाजीबापू झोळ,हिंगणी गावचे सरपंच मा.हनुमंत बाबर-पाटील,मा.सुजीततात्या बागल,केतूरचे उपसरपंच मा.प्रशांत नवले, राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष मा.लक्ष्मीकांत पाटील,मा.राजेंद्र बाबर उपस्थित होते.
आमदार संजयमामा शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत आज भरत जाधव, संपतराव जाधव, महादेव बाबर ,रामचंद्र जाधव, शंकर जाधव ,सचिन जाधव ,नितीन जाधव ,नागनाथ जाधव ,प्रकाश जाधव, विनोद जाधव, रामचंद्र बाबर, हिरालाल गायकवाड, भास्कर गवळी ,अंगत बाबर, भास्कर बाबर, लक्ष्मण पवार, शकील शेख, अक्षय मोरे , सागर मांढरे ,अंकुश बाबर ,महेश जाधव, सुदर्शन जाधव, विजय जगताप ,आश्रम जगताप , केशव जाधव ,संदेश जाधव, बाबासाहेब गलांडे, दत्तात्रय तावरे, पप्पू शिंदे ,नवनाथ जगताप आदी कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. यावेळी बोलताना आमदार शिंदे म्हणाले की, ज्या विश्वासाने हिंगणी येथील कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केलेला आहे, त्यांच्या विश्वासाला तडा न जाऊ देता गावातील अडचणी आपण प्राधान्याने सोडवणार असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.

saptahikpawanputra

Recent Posts

राहुल रसाळ आणि कपिल जाचक ही ज्ञानाची विद्यापीठे… कमलाई कृषी प्रदर्शन २०२४ चे उद्घाटन प्रसंगी डॉ. अविनाश पोळ यांचे करमाळा येथे प्रतिपादन.

करमाळा प्रतिनिधी १५ ते २० देशांतून भ्रमंती करून ज्ञानसंग्रह करणारे राहुल रसाळ आणि गेल्या ५०…

2 hours ago

महात्मा गांधी विद्यालय करमाळा येथे वर्गमित्रांचे तब्बल 45 वर्षांनी  संमेलन एक सुखद झुळुक

माणसाने निवृत्त झाल्यावर एकत्रित येऊन जुन्या आठवणींना उजाळा आणि मैत्रीचे नूतनिकरण करण्याची आलेली सुवर्णसंधी दवडायची…

1 day ago

भारताचे माजी पंतप्रधान भाजपचे ज्येष्ठ नेते स्व. अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त भाजपच्यावतीने अंगणवाडीतील चिमुकल्यांना शालेय साहित्याचे वाटप

करमाळा प्रतिनिधी जेष्ठ संसदपटू असलेले अटलबिहारी वाजपेयी राजकारणात चार दशक सक्रीय होते.असे मत भारतीय जनता…

2 days ago

भागवत कथाही कल्पवृक्षासारखी असून कलियुगात देवाला प्रत्यक्ष पाहण्याची ताकद मानव जीवनाचे सार्थक करण्याची गुरुकिल्ली -साध्वी प.पू अनुराधा दिदी शेटे पंढरपूरकर

करमाळा प्रतिनिधी भागवत कथाही कल्पवृक्षासारखी असून कलियुगात देवाला प्रत्यक्ष पाहण्याची ताकद मानव जीवनाचे सार्थक करण्याची…

3 days ago

भारतरत्न माजी पंतप्रधान स्व.अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त देवळाली येथे नेत्ररोग तपासणी संपन्न

करमाळा प्रतिनिधी पाठवा :- दिवंगत भाजपा नेते, भारताचे माजी पंतप्रधान तथा भारतरत्न स्व. अटलबिहारी वाजपेयी…

4 days ago

अवैध वाळु उपसा बंद करा आमदार नारायण पाटील जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना पञ

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यात गेली काही दिवसांपासून उजनी जलाशय व सीना नदीतून अवैधरित्या उपसा सुरू…

4 days ago