स्व.नामदेवराव जगताप यांचा वारसा जपणारे प्रताप जगताप यांचे कार्य प्रेरणादायी-वसिमभाई पठाण

करमाळा प्रतिनिधी  स्व.नामदेवराव जगताप यांचा वारसा आज प्रतापराव जगताप हे योग्य पध्दतीने चालवत असल्याचे प्रतिपादन अखिल भारतीय काँग्रेस आय अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हाध्यक्ष वसीमभाई पठाण यांनी व्यक्त केले.ते केम ता.करमाळा येथील अल्पसंख्यांक काँग्रेस आय शाखेच्या उद्घाटना प्रसंगी बोलत होते.यावेळी व्यासपिठावर तालुकाध्यक्ष प्रतापराव जगताप, सरदारभाई पठाण उपस्थित होते. ,पुढे बोलताना श्री.पठाण म्हणाले कि स्व. नामदेवराव जगताप यांचे कार्य खुप मोठे आहे.पुणे जिल्ह्यात होणारे उजनी धरण केवळ आणि केवळ नामदेवरावजी जगताप साहेबांच्या दुरदृष्टीकोनामुळे ते सोलापुर जिल्ह्यात झाले हे खुप मोठे उपकार संपुर्ण जिल्ह्यासाठी आहेत.आज देशामध्ये वाढत चाललेली महागाई,वाढती बेरोजगारी हे मुद्दे दुर्लक्षित करण्यासाठी जाती जाती मध्ये तिढा निर्माण करुन आपली राजकीय पोळी भाजुन घेण्याचा प्रयत्न भा.ज.पा.सरकार करत आहे.ज्या पध्दतीने आज श्रीलंका देशाची अवस्था महागाई मुळे व देशावरील वाढत्या कर्जामुळे झाली आहे त्याच दिशेने आपला भारत देश ही जातोय कि काय याची चिंता सर्व देशवासियांच्या मनात आहे.आज संपुर्ण राज्यात केवळ करमाळा तालुक्यातच पक्षाच्या शाखेच्या उद्घाटनाचा धडाका पहावयास मिळत आहे हि अतिशय कौतुकास्पद बाब आहे.
यावेळी तालुकाध्यक्ष प्रतापराव जगताप यांनी आपण गाव तिथ शाखा आणि घर तिथे कार्यकर्ता हाच संकल्प हाती घेतला असुन तो कसल्याही परिस्थितीत पुर्णत्वास घेऊन जाणार असल्याचे सांगितले.आज पर्यंत सावडी, हिंगणी,मोरवड,कुगाव,आणि आज केम या ठिकाणी शाखा झालेल्या आहेत.फक्त शाखा काढुन चालणार नसुन काँग्रेस पक्षवाढीसाठी प्रत्येकाने प्रयत्न करणे गरजेचे आहे.त्यासाठी आपण सर्वोपतारी मदत करण्यास तयार असल्याचेही शेवटी त्यांनी सांगितले.
हजरत बापुसाहेब रह.अलैह दरगाह या ठिकाणी चादर चढवुन तद्नंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन सदर रॕली शाखेच्या बोर्डाजवळ पोहचली.त्याठिकाणी सरदारभाई पठाण यांच्या शुभहस्ते शाखेचे उद्घाटन करण्यात आले.यावेळी शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते.सभागृहामध्ये झालेल्या बैठकीत अल्पसंख्यांक विभागाचे पहीले तालुकाध्यक्ष दस्तगीरभाई पठाण यांची अल्पसंख्यांक विभागाच्या जिल्हाउपाध्यक्षपदी नियुक्ती झाल्यामुळे त्या जागी जावेदभाई शेख यांची नवीन नियुक्ती प्रतापराव जगताप यांच्या विनंतीनुसार जिल्हाध्यक्ष वसीमभाई पठाण यांनी केली.केम शाखेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी सोहेलभाई पठाण,नितीन चोपडे,यांनी आपले विचार व्यक्त केले.या कार्यक्रमासाठी तालुका उपाध्यक्ष प्रतापराव खाडे, तालुका संघटक रणजीत कांबळे उपस्थित होते.सुत्रसंचलन व आभार प्रदर्शन महेश गोसावी यांनी केले.यानंतर सर्वांची अल्पउपहाराची व्यवस्था करण्यात आली होती.

saptahikpawanputra

Recent Posts

भारतरत्न माजी पंतप्रधान स्व.अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त देवळाली येथे नेत्ररोग तपासणी संपन्न

करमाळा प्रतिनिधी पाठवा :- दिवंगत भाजपा नेते, भारताचे माजी पंतप्रधान तथा भारतरत्न स्व. अटलबिहारी वाजपेयी…

13 hours ago

अवैध वाळु उपसा बंद करा आमदार नारायण पाटील जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना पञ

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यात गेली काही दिवसांपासून उजनी जलाशय व सीना नदीतून अवैधरित्या उपसा सुरू…

14 hours ago

करमाळ्यात रविवारी २९ डिसेंबरला होणार भव्य ग्लोबल टॅलेंट सर्च परीक्षा २०२४-२५

करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील ज्ञानसेवा सोशल फाउंडेशन संचलित ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा यांच्या ४ थ्या…

2 days ago

२७ डिसेंबर रोजी करमाळ्यात कमलाई कृषी प्रदर्शन… निर्यातक्षम केळी व डाळिंब या विषयावरती परीसंवादाचे आयोजन… शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे पाणी फाउंडेशनचे आवाहन

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…

4 days ago

आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्था करमाळा आयोजित जाधव -पाटील हॉस्पिटलमध्ये 6 व्या मुळव्याधसंबंधी शिबिराची यशस्वी सांगता

करमाळा प्रतिनिधी  करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…

4 days ago

पंढरपूर येथे श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीच्यावतीने उद्योजक संतोष काका कुलकर्णी यांचा सहकुटुंब सत्कार

करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील‌ उद्योजक क्लासिक कंपनीचे ‌ मालक ‌ अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचे करमाळा…

4 days ago