करमाळा प्रतिनिधी :
करमाळा तालुक्यातील सर्वात मोठे जेऊर रेल्वे स्थानक आहे, या रेल्वेस्थानकावर अनेक गाड्या थांबतात परंतु हुतात्मा एक्सप्रेस, उद्यान एक्सप्रेस याही गाड्यांना या स्थानकावर थांबा मिळावा अशी मागणी विभागीय रेल्वे व्यवस्थापक सोलापुर यांच्याकडे माजी मंत्री तथा आमदार सुभाष बापू देशमुख यांच्या शिष्टमंडळाद्वारे करण्यात आली असल्याची माहिती भाजपा युवा मोर्चा प्रदेश सचिव दिपक चव्हाण यांनी दिली.याबाबत सकारात्मक चर्चा झाली असून निश्चितपणे जेऊर येथे हुतात्मा एक्सप्रेसला येत्या काही दिवसामध्ये थांबा मिळावण्यासाठ प्रयत्नशील राहू, असे मतविभागीय रेल्वे विभागीय व्यवस्थापक सोलापूर यांनी व्यक्त केले. ही गाडी थांबल्यास पुणे, मुंबई, सोलापूर जाणाऱ्या प्रवाशांची चांगली सोय होणार आहे.
करमाळा तालुक्यासह जामखेड, कर्जत, परांडा या परिसरातील प्रवाशांची सोय होणार आहे. तसेच केम येथे हैदराबाद -मुंबई व चेन्नई -मुंबई या रेल्वे गाडी ना पूर्वीचा थांबा कायम करावा अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी नरेंद्रसिंह ठाकूर व आदी मान्यवर उपस्थित होते.
करमाळा प्रतिनिधी पाठवा :- दिवंगत भाजपा नेते, भारताचे माजी पंतप्रधान तथा भारतरत्न स्व. अटलबिहारी वाजपेयी…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यात गेली काही दिवसांपासून उजनी जलाशय व सीना नदीतून अवैधरित्या उपसा सुरू…
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील ज्ञानसेवा सोशल फाउंडेशन संचलित ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा यांच्या ४ थ्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील उद्योजक क्लासिक कंपनीचे मालक अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचे करमाळा…