कुकडीचे  मांगी तलावात सोडा; अन्यथा २७ जुलैला आंदोलन करणार  संतोष वारे यांची माहिती

 

करमाळा प्रतिनिधी   कुकडीचे प्रक्ल्पाचे पाणी मांगी तलावात तसेच तलावाखालील परिसरातील गावांना मिळवण्यासाठी येत्या बुधवारी २७ जुलैला सकाळी १० वाजता टेंभुर्णी-अहमदनगर या राज्यमार्गावर जातेगाव (ता.करमाळा) येथे रास्ता रोको आंदोलन करणार असल्याचे राष्ट्रवादी तालुका काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संतोष वारे यांच्या नेतृत्वाखाली होत असून या आंदोलनात सर्वपक्षीय गटातटाचे नेते सहभागी होणार असल्याची माहिती श्री.वारे यांनी दिली.अधिक माहिती देताना श्री. संतोष  वारे म्हणाले  की, करमाळा तालुक्यातील काही भागात अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही. मांगी व तलाव परिसरात आतापर्यंत समाधानकारक पाऊस पडला नसल्याने येणाऱ्या काही दिवसांमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होताना दिसणार आहे. मांगी तलावावर बारा गावांसाठी पाणीपुरवठा योजना आहे, परंतु मांगी तलावामध्ये उपलब्ध पाणीसाठा नसल्यामुळे ही योजना सध्याच्या स्थितीत बंद अवस्थेत आहे. तरी याचा पाठपुरावा कुकडी कोळवाडी कार्यालयात तसेच करमाळा तहसील कार्यालय यांना वेळोवेळी निवेदन देऊन व रस्ता रोको आंदोलन करूनही कुकडीच्या अधिकारी मांगीतलावात व परिसरात कुकडीचे पाणी कॅनल चारीला पाणी सोडण्यास टाळाटाळ करीत आहेत. कुकडी धरणाचा पाणीसाठा पाहता कुकडी धरणांमध्ये मुबलक पाणी साठा शिल्लक आहे. तसेच आता त्या ठिकाणी पावसाचे प्रमाण चांगल्या प्रकारे असल्यामुळे सध्या ओव्हर फ्लो चे पाणी श्रीगोंदा, कर्जत तालुक्यात सुरू आहे. ते पाणी मांगी तलाव, रावगाव, भोसे, पुनवर, जातेगाव, वडगाव, कामुणे, खडकी, पोथरे अशा कुकडीच्या कॅनल चारीला सोडण्यात यावे. यासाठी रस्ता रोको करण्यात येणार आहे. असा इशारा राष्ट्रवादी तालुका काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संतोष वारे तसेच सर्व पक्षीय पदाधिकारी व आंदोलकांनी दिला आहे.दिलेल्या निवेदनावर तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी किसान सभा सचिन नलवडे, स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे ता. अध्यक्ष सुदर्शन शेळके, रामभाऊ नलावडे, विठ्ठल शिंदे, संदीप नलवडे, लक्ष्मण भालेराव, चंद्रकांत काळे, शिवदास नलवडे, औदुंबर नलवडे, अजित पवार, रमेश पाटील, माधव पाटील, महेश मोरे, आप्पा जाधव, समीर शेख, अशोक वारे, बापु बर्डे, राहुल पवार, छगन लगस, पंकज नलावडे, दादासाहेब कुदळे, संजय शिंदे, सागर जगताप, अशोक शिंदे, अशोक वारे आदिंच्या सह्या आहेत.

 

saptahikpawanputra

Recent Posts

ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांची तालुकास्तरीय स्पर्धेत दुहेरी बाजी बुद्धिबळात प्रतीक नामदे तर कुस्तीमध्ये राम सरडे प्रथम

  करमाळा प्रतिनिधी : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा येथील विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत…

16 hours ago

करमाळयात गणेशोत्सवानिमित्त सर्वोदय प्रतिष्ठानची तीन दिवसीय व्याख्यानमाला अरविंद जगताप, देवा झिंजाडे, प्रभाकर साळेगावकर यांची व्याख्याने; १९ ते २१ सप्टेंबरदरम्यान आयोजन

करमाळा : प्रतिनिधी गणेशोत्सवाच्या निमित्ताने करमाळ्यातील सर्वोदय प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही तीन दिवसीय बौद्धिक व्याख्यानमालेचे…

19 hours ago

दोन-तीन वाडे होते… पण स्वप्न मोठे होते; साखरे सरांनी घडविला राजुरीचा शैक्षणिक इतिहास! शिक्षकांच्या सामर्थ्यापुढे भव्य इमारतीही फिक्या; प्रा. डॉ. राजेंद्र दास

करमाळा : प्रतिनिधी राजुरीसारख्या ग्रामीण भागात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवताना स्व. सुखदेव साखरे सरांसमोर अनेक अडचणी…

21 hours ago

ग्लोबल सायन्स इन्स्टिटयूट च्या राम सरडे चा तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक*

*  करमाळा  प्रतिनिधी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळाचा विद्यार्थी राम धनंजय…

2 days ago

सणासुदीच्या काळात करमाळ्यातील सायंकाळचे भारनियमन रद्द करा -दिग्विजय बागल

करमाळा : प्रतिनिधी – करमाळा तालुक्यात पावसाळा सुरू झाल्यापासून समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने दुष्काळी परिस्थिती…

2 days ago