मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हिंदहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचारच पुढे नेत आहेत- अनिल बोरे

 

करमाळा (प्रतिनिधी)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे यांचे हिंदुत्ववादाचा विचार पुढे घेऊन राजकारण व समाजकारण करीत असून त्यांना संपूर्ण महाराष्ट्रातील मिळत असलेला पाठिंबा म्हणजे त्यांच्या भूमिका संपूर्ण महाराष्ट्राने स्वीकारली आहे असे मत ठाणे महानगरपालिका परिवहन सभापती अनिल बोरे यांनी व्यक्त केले

शिंदे समर्थक शिवसैनिकांचा आढावा घेण्यासाठी ती आज करमाळा दौऱ्यावर आले असता शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष करमाळा येथे त्यांनी भेट देऊ शहरातील पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख महेश शहर प्रमुख संजय शीलवंत उपशहर प्रमुख राजेंद्र काळे नागेश गुरव हिवरवाडी चे शाखाप्रमुख आजिनाथ इरकर कोळगाव चे शाखाप्रमुख नागेश शेंडगे शिवसेना वैद्यकीय मदत पक्षाचे तालुका समन्वयक दीपक पाटणे रंभापुरा शाखाप्रमुख निलेश चव्हाण मारुती भोसले भोसे चे शाखाप्रमुख बाळासाहेब आडसूळ संजय जगताप शुभम मोहिते हिवरवाडी चे माजी सरपंच राजेंद्र मिरगळ उपस्थित होते

मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे विराजमान झाल्यानंतर महाराष्ट्रातील प्रत्येक शिवसैनिकाला आपला माणूस मुख्यमंत्री झाल्यासारखे वाटत असून खऱ्या अर्थाने शिवसैनिकाचा आता स्वाभिमान जागा झाला आहे करमाळा तालुक्यातील माजी आमदार नारायण आबा पाटील यांच्या उपस्थितीत मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दालनात बैठकीचे आयोजन करण्यात येणार असून तालुक्यातील सर्व प्रश्न सोडवणार आहेयावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख महेश चिवटे यांच्या हस्ते अनिल बोर यांचा सत्कार करण्यात आला.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत नारायण पाटील यांना शिवसेनेचे आमदार म्हणून निवडून आणण्यासाठी आत्तापासूनच तालुक्यातील सर्व शिवसैनिक कामाला लागल्या असून करमाळ्याचा भगवा झेंडा विधानसभेत फडकेल असा विश्वास यावेळी उपजिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी व्यक्त केला आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

करमाळा शहरातील दगडी रोड येथील रहिवासी शारदा पिसे दुःखद निधन

करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील दगडी रोड येथील रहिवासी शारदा सुरेश पिसे (वय ७१) यांचे अल्पशा…

1 hour ago

लोकशाही बचाव अराजकता हटाव सोलापूरच्या भाजप मोर्चाच्या नियोजनासाठी भाजप जिल्हा युवा नेते दिग्विजय बागल यांच्या उपस्थितीत करमाळ्यात १ नोव्हेंबरला बैठक- सचिन पिसाळ

करमाळा प्रतिनिधी काँग्रेस इंडी आघाडी आणि डाव्या पक्षांकडून भारतीय जनता पक्षाविरोधात खोटा प्रचार करून पक्षाची…

5 days ago

दुष्काळ व पाणीटंचाई संदर्भातील बैठक आमदार.नारायण (आबा)पाटील यांनी जेऊर येथे न घेता करमाळा येथे पंचायत समिती सभागृहात घ्यावी- ॲड. अजिनाथ विघ्ने उपसभापती पं.स.करमाळा

करमाळा प्रतिनिधी  करमाळा तालुक्याची दुष्काळ निवारण व पाणीटंचाई आढावा बैठक आमदार. नारायण( आबा) पाटील यांचे…

1 week ago

डॉ अजिंक्य पवार यांची एम.डी. परीक्षेत यशस्वी भरारी; जनरल मेडिसिनमध्ये पदव्युत्तर पदवी संपादन डॉ. रविकिरण पवार कुटुंबीयांचा अभिमान उंचावला सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव

करमाळा : प्रतिनिधी मेहनत, जिद्द, सातत्यपूर्ण अभ्यास आणि ध्येयाप्रती असलेल्या निष्ठेच्या जोरावर डॉ. अजिंक्य रविकिरण…

1 week ago

प्रा. डॉ. महेश निकत यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान; करमाळ्याच्या शैक्षणिक क्षेत्राचा गौरव

  करमाळा, प्रतिनिधी : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा यांचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. महेश मच्छिंद्र…

1 week ago