करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील वांगी नं 3 येथे तीन चोरट्यानी दरवाजाचे कुलूप तोडून घरामध्ये प्रवेश करून स्वयंपाक खोलीतील कपाटामध्ये ठेवलेल्या दागिन्याची चोरी केली आहे.दोन लाख एक्कोण्णोतीस हजार पाचशे दागिन्याची चोरी झाली असुन याबाबत धनंजय किसन तळेकर रा.वांगी 3 यांनी फिर्याद दिली असुन पोलिस निरिक्षक सुर्यकांत कोकणे यांनी माहिती दिली आहे. यामध्ये अडीच तोळ्याचे सोन्याचे गंठन किमंत रूपये,70,500/- रु. दीड तोळ्याची सोन्याची फुलं व झुबे किंमत रुपये23,500/- रू. ची अर्धा तोळा सोन्याची पिळ्याची अंगठी किमंत रूपये. 14,000/- रू. चे तीन ग्रॅम सोन्याचे मणी किमत रुपये.4,000/- रूपये रोख रक्कम त्यामध्ये 500 रूपये दराचे 02 व 100 रूपये दराचे 30 चलनी नोटा.एकूण – 2,29,500/-* या वर्णनाचे सोन्याचे दागिणे व रोख रक्कम हे लबाडीने चोरून नेलेले आहेत.याबाबतीत भा.द.वि. कलम 457, 380 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन एका आरोपिला पकडण्यात यश आले आहे पुढील तपास सपोनि जगताप हे करीत आहे.
करमाळा प्रतिनिधी : करमाळा शहर व तालुक्यातील सर्व शिवप्रेमींची गेल्या अनेक वर्षांपासूनची बहुप्रतिक्षित इच्छा आता…
जेऊर (प्रतिनिधी): करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा विस्कळीत वीजपुरवठा आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज विजेच्या लपंडावाविरोधात आज…
* करमाळा प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टी सोलापूर ग्रामीण पश्चिम जिल्हा कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक अकलूज…
करमाळा प्रतिनिधी सध्याच्या आधुनिक काळात पत्रकारिता क्षेत्रात मोठ्या संख्येने नवोदित आणि होतकरू तरुण वर्ग…
करमाळा : प्रतिनिधी करमाळा शहरासह तालुक्यातील नागरिकांसाठी आरोग्यसेवेच्या क्षेत्रात महत्त्वाची भर पडणार असून, जाधव-पाटील हॉस्पिटलमध्ये…
करमाळा: प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा वीजपुरवठा सातत्याने खंडित करणे आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज वीज…