सोलापूर जिल्ह्याच्या भूमिपुत्राच्या कार्याचा गौरव*
मुंबई,दि- मुख्यमंत्री कार्यालयात विशेष कार्यकारी अधिकारी पदावर नियुक्ती होवून राज्यातील सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याचे असलेल्या मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे प्रमुख म्हणून स्वीकारल्याबद्दल डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्रचे अध्यक्ष व ज्येष्ठ संपादक राजा माने यांनी मंगेश चिवटे यांचा सत्कार आज त्यांच्या कार्यालयात केला.यावेळी मंत्रालय कर्मचारी सहकारी बँकेचे संचालक व माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातील अधीक्षक सुनील खाडे हे उपस्थित होते. गेल्या काही वर्षांत शिवसेनेच्या बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय कक्षाच्या माध्यमातून आरोग्य सेवा क्षेत्रात गोरगरीबांसाठी मंगेश चिवटे यांनी केलेल्या सेवेचा गौरव त्यांची निवड करुन मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांनी केला आहे.कोविड महामारी काळात स्वतः चार जीव धोक्यात घालून कार्य करणाऱ्या सोलापूर जिल्ह्यातील करमाळ्याच्या या भूमिपुत्राच्या कार्याचा बहुमान केल्याबद्दल राजा माने यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त करुन मंगेश चिवटे यांना शुभेच्छा दिल्या.यावेळी पत्रकार तथा जनसंपर्क अधिकारी नितीन जाधव हेही उपस्थित होते.
मुंबई /प्रतिनिधी देशभरातील माध्यमांतील पत्रकार व संपादक यांच्या न्याय हक्कांसाठी संपादक व जेष्ठ माध्यम तज्ञ…
करमाळा, प्रतिनिधी - राज्यभर व्याप्ती असलेल्या युवा भिम सेना या सामाजिक संघटनेच्या वतीने दिला जाणारा…
करमाळा प्रतिनिधी Tv 9 मराठीचे करमाळा येथील पत्रकार शितलकुमार मोटे यांना जगदीशब्द फाउंडेशनचा राज्यस्तरीय क्रांतिसूर्य…
करमाळा प्रतिनिधी पुरुषाबरोबर स्त्रिया सर्व क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळवत असून स्वतःच्या पायावर उभा राहूनच आपल्या…
सोलापूर प्रतिनिधी समरसतेची वारी... साहित्यिकांच्या घरी* समरससता साहित्य परिषद महाराष्ट्र सोलापूर शाखेच्या वतीने *‘समरसतेची वारी...…
भिगवण प्रतिनिधी : स्वामी चिंचोली, तालुका दौंड, जिल्हा पुणे येथील दत्तकला कॉलेज ऑफ फार्मसी या…