विट जि.प गटाची निवङणुकीची रंगत ! बागलगटाकडून चिंतामणी दादा जगताप यांच्या नावाची चर्चा

करमाळा प्रतिनिधी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवङणुकीच्या अनुषंगाने विट जि.प गटाची निवङणुक रंगतदार होणार असल्याची चिन्ह दिसु लागली आहे , कारण आज पार पङलेल्या आरक्षण सोङती मध्ये विट जि.प गट हा सर्वसाधारण झाला आहे . या गटा मध्ये दोन पं.स. गण 1) हिसरे 2) विट. हिसरे गणातील गावे खालील प्रमाणे हिसरे, हिवरे, फीसरे, कोळगाव, निमगाव, गौंङरे, आर्जुननगर, मिरघव्हण, म्हसेवाङी, भालेवाङी, महादेवमळा, सौंदे, शेलगाव इ.. तर विट गणात विट, रोशेवाङी, हिवरवाङी, मोरवङ, पिंपळवाङी, विहाळ, वंजारवाङी, देवळाली, खङकेवाङी, गुळसङी आणि करमाळा ग्रामीण इत्यादी गावांचा समावेश आहे. यातील आक्षेपा नंतर दिलमेक्ष्वर, वाघाचीवाङी आणि भोसे हि गावे वगळण्यात आली आहेत.
विट जि.प गटाच्या माजी सदस्या सौ.लक्ष्मी आवटे आहेत त्यांनी मोठ्या फरकाने सौ चोगुले यांचा पराभव केला होता . सद्या च्या निवङणुकीत वेगवेगळ्या गटां मधुन बर्याच इच्छुकांची नावे पंचक्रोशीत चर्चेत आहेत त्या मध्ये प्रमुख नावे श्री.बिभिषण आवटे, माजी अधिकारी श्री. गौतम जगदाळे, श्री गहिनीनाथ ननवरे आणि बागल गटा कङुन दोन दौरे पुर्ण करून मतदारसंघ पिजुन कढणारे व सौ. रश्मी दिदी बागल, श्री.दिग्विजय बागल आणि श्री.विलासरावजी घुमरे सरांचे विश्वासु समजले जाणारे श्री चिंतामणी दादा जगताप यांचेही नाव चर्चेत आहे.
आणखी बरेच नावे चर्चेत असु शकतात परंतु निवडणूकीच्या तोंङावरती किती इच्छुक टिकतात आणि किती जातात हे पहावे लागेल कारण जि.प निवडणूक म्हटले की प्रमुख प्रश्न तीन , एक तर ज्यात्या गटाच्या नेत्याची उमदेवाराची निवङ , दुसरे म्हणजे इच्छुक उमेदवाराचा मतदारसंघातील संपर्क आणि तिसरे आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे आर्थिक गणित. इत्यादी बाबींमुळे विट जि.प ची निवङणुक रंगतदार होणार हे नक्की .
उद्या जर निवङणुक आयोगाच्या ओ.बी.सी.आरक्षणाच्या सोङती बाबत च्या निर्णयास सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती देवुन ओ.बी.सी आरक्षणच रद्द केले तर हे चित्र-विचित्रही होऊ शकते ! हे नक्की

saptahikpawanputra

Recent Posts

योगासन स्पर्धेत कु. हरिश मंडलिक तालुक्यात प्रथम; नगरसेविका सौ. सुवर्णा रोहिदास आल्हाट यांच्या हस्ते सत्कार

* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…

2 days ago

कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाच्या वैभव सुरवसे ची विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

  करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…

3 days ago

उजनीच्या पाण्यावर १५ अब्ज युरोच्या एआय डेटा सेंटरची नजर! पाणी आरक्षणाला तात्काळ स्थगिती देण्याची खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांची मागणी

करमाळा  प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…

4 days ago

वाढदिवसाचा आनंद शाळेसाठी; कुलकर्णी परिवाराची पाच हजारांची देणगी मल्हारच्या वाढदिवसानिमित्त राजुरी जिल्हा परिषद शाळेला मदतीचा हात

करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…

4 days ago

नवलेखक-नवकवींसाठी रविवारी कार्यशाळा* समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळातर्फे आयोजन

सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…

5 days ago

मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा पूर्ववत करा रश्मी बागल यांची पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांना भ्रमण ध्वनि द्वारे विनंती

  करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…

5 days ago