करमाळा प्रतिनिधी आईच्या निधनाचे दुःखावर मात करून कु. तृप्ती राजेंद्र शिंदे रा.बुरुडगाव जि अहमदनगर हिने डी .फार्मसी परिक्षेत 79% गुण मिळवुन उत्तुंग यश मिळवले आहे. तृप्तीची आई सौ शोभा राजेंद्र शिंदे हिचे गेल्यावर्षी हृदयविकाराच्या झटक्याने आकस्मिक निधन झाले अशा परिस्थितीमध्ये तृप्ती हिने दुःखाला बाजुला सारून आपल्या आईची इच्छा पुर्ण केली आहे.आईची इच्छा होती की मी शिकुन स्वतःच्या पायावर उभे रहावे तिची आशिर्वाद हिच प्रेरणा घेऊनच आपण अभ्यास केला. एकत्र कुटुंब असल्यामुळे आजोबा वसंतराव शिंदे आजी पार्वती शिंदे वडील राजेंद्र शिंदे काका अंकुश शिंदे दिलीप शिंदे सुभाष शिंदे, आईची माया देणाऱ्या काकु वैशाली कविता कावेरी आत्या पुष्पा मामा धीरज खैरे भगिनी पुजा आरती यांचे प्रोत्साहन मार्गदर्शन याचा आशिर्वाद मिळाल्यामुळे आपण यश मिळवल्याचे तिने सांगितले.कु. तृप्ती शिंदे पत्रकार दिनेश मडके यांची भाची आहे. लहानवयात मातृछत्र हरपलेल्या प्रतिकुल परिस्थितीत दुःखावर मात करुन तृप्ती शिंदे हिने मिळवलेल्या यशाबद्दल सर्वत्र तिचे अभिनंदन करुन कौतुक होत आहे.
* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…
करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…
करमाळा प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…
करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…
सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…
करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…