करमाळा अर्बन बँक सुस्थितीत चेअरमन कन्हैयालाल देवी

करमाळा  प्रतिनिधी  रिझर्व्ह बँकेने (RBI) ने राज्यातील तीन सहकारी बँकावर बँकेची आर्थिक स्थिती ढासळल्याचे लक्षात आल्यानंतर या बँकावर पैसे काढण्यासह अन्य निर्बंध लागू केलेले आहेत. त्यामध्ये करमाळा जि.सोलापूर येथील करमाळा को.ऑप.बँक लि.करमाळा जि.सोलापूर या बँकेचा समावेश असून या बँकेच्या ग्राहकांना आता 10 हजार रुपयांच्यावर रक्कम काढता येणार नाही. एकावेळी 10 हजार रुपये पर्यंत पैसे काढता येणार आहेत.
या बँकावर निर्बंधाचा भाग म्हणून दोन सहकारी बँका कर्ज देवू शकत नाहीत. त्याच बरोबर कोणतीही गुंतवणूक करु शकत नाहीत. कोणत्याही प्रकारच्या नवीन ठेवी स्विकारु शकत नाहीत. तसेच पैसे उधार घेणे व मालमत्तेचे विवरण करणे आदिवर निर्बंध घालण्यात आलेल्या आहेत. या तीन बँकांना निर्बंध जारी करणे म्हणजे त्यांचा बँक परवाना रद्द करणे असा अर्थ कोणी काढू नये फक्त् बँकेची आर्थिक स्थिती सुधारणे पर्यंत व बँकेची स्थिती अधिक मजबुत करण्यासाठी हे निर्बंध लागू करण्यात आलेले आहेत. असे ही रिर्झव्ह बँकने म्हणालेले आहे.
याबाबत दि.करमाळा अर्बन को.ऑप. बँकेचे चेअरमन श्री.कन्हैयालाल गिरधरदास देवी  म्हणाले की, RBI च्या सुचनेनुसार बँकेच्या कामकाजामध्ये सुधारणा करुन जवळपास 1 कोटी रु.चे शेअर्स, भागभांडवल गोळा केलेले आहे. त्याच बरोबर 3.50 कोटी रु.ची थकीत वसुली पुर्ण केलेली आहे हा अहवाल आम्हीं येत्या आठ दिवसामध्ये RBI ला सादर करणार असून एका महिन्याच्या आत बँकेवरील सर्व निर्बंध उठविले जातील. त्याच बरोबर सध्या बँकेकडे ज्या नागरिकांच्या ठेवी आहेत त्या ठेवी सुरक्षित असून या ठेवींना विमा कवच असल्यामुळे ठेवीदारांनी घाबरण्याचे काहीच कारण नाही सर्व ठेवीदारांच्या ठेवी सुरक्षित असून ठेवीदारांनी निश्चिंत रहावे असा निर्वाळा श्री. कन्हैय्यालाल देवी यांनी दिला आहे.
saptahikpawanputra

Recent Posts

यशवंत शिंदे यांची नेमबाजी स्पर्धेत सुवर्णपदकाला गवसणी! ४१ व्या महाराष्ट्र राज्य नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदकमाढा तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा

करमाळा प्रतिनिधी  निमगाव (टें.) येथील आदर्श सरपंच तथा विठ्ठल कॉर्पोरेशनचे कार्यकारी संचालक श्री. यशवंत संजयमामा…

20 mins ago

प्राचार्य बाळासाहेब नरारे यांना पुरी (ओडिशा) येथे ‘सुकुमारी स्वरमनी’ पुरस्काराने सन्मानित

करमाळा प्रतिनिधी करमाळा  येथील कमलाभवानी बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष तथा सुरताल संगीत विद्यालयाचे प्राचार्य श्री. बाळासाहेब…

6 hours ago

करमाळा शहरातील दगडी रोड येथील रहिवासी शारदा पिसे दुःखद निधन

करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील दगडी रोड येथील रहिवासी शारदा सुरेश पिसे (वय ७१) यांचे अल्पशा…

23 hours ago

लोकशाही बचाव अराजकता हटाव सोलापूरच्या भाजप मोर्चाच्या नियोजनासाठी भाजप जिल्हा युवा नेते दिग्विजय बागल यांच्या उपस्थितीत करमाळ्यात १ नोव्हेंबरला बैठक- सचिन पिसाळ

करमाळा प्रतिनिधी काँग्रेस इंडी आघाडी आणि डाव्या पक्षांकडून भारतीय जनता पक्षाविरोधात खोटा प्रचार करून पक्षाची…

6 days ago

दुष्काळ व पाणीटंचाई संदर्भातील बैठक आमदार.नारायण (आबा)पाटील यांनी जेऊर येथे न घेता करमाळा येथे पंचायत समिती सभागृहात घ्यावी- ॲड. अजिनाथ विघ्ने उपसभापती पं.स.करमाळा

करमाळा प्रतिनिधी  करमाळा तालुक्याची दुष्काळ निवारण व पाणीटंचाई आढावा बैठक आमदार. नारायण( आबा) पाटील यांचे…

1 week ago

डॉ अजिंक्य पवार यांची एम.डी. परीक्षेत यशस्वी भरारी; जनरल मेडिसिनमध्ये पदव्युत्तर पदवी संपादन डॉ. रविकिरण पवार कुटुंबीयांचा अभिमान उंचावला सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव

करमाळा : प्रतिनिधी मेहनत, जिद्द, सातत्यपूर्ण अभ्यास आणि ध्येयाप्रती असलेल्या निष्ठेच्या जोरावर डॉ. अजिंक्य रविकिरण…

1 week ago