स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत प्रस्थापितांविरोधात लढण्यासाठी तयार रहा : अतुल खूपसे पाटील


करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील जि.प.च्या 6 तर पंचायत समितीच्या 12 जागा जनशक्ती शेतकरी संघटना पूर्ण ताकदीनिशी लढणार आहे अशी घोषणा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अतुलभाऊ खुपसे पाटील यांनी केली.
 दि.30 जुलै रोजी सकाळी 11 वा. करमाळा येथील दत्त मंदिर येथे संघटनेच्या कार्यकर्ता मेळाव्यामध्ये ही घोषणा त्यांनी केली.
बैठकीच्या सुरवातीला करमाळा तालुक्यातील इच्छुक महिला व पुरुष कार्यकर्त्यांनी आपआपली मनोगते व्यक्त करुन ही निवडणूक लढविण्याचा निर्धार बोलून दाखविला. त्यानंतर कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना अतुलभाऊ खुपसे पाटील म्हणाले की, जनशक्ती शेतकरी संघटना ही जात-पात, धर्म, पंथ, न माननारी संघटना असून मानवता हाच धर्म माणून समाजातील अठरापकड जातीच्या धर्माच्या लोकांना न्याय देण्यासाठी काम करणारी संघटना आहे. या संघटनेच्या माध्यमातून सत्तेवर ज्यांची मक्तेदारी आहे ही मक्तेदारी नष्ट करण्यासाठी गोरगरीब, कष्टकरी घरातील उमेदवारांना निवडणूकीमध्ये उभे करुन त्यांना सत्तेवर बसविण्याचे काम संघटनेच्या माध्यमातून केले जाणार आहे असे स्पष्ट करुन खुपसे म्हणाले की, करमाळा तालुक्यातील जनतेने आता पर्यंत आ.शिंदे, माजी आ.पाटील, माजी आ.बागल यांना मते देवून मोठे केले त्यांनी सत्तेचा उपयोग जनतेसाठी नव्हेतर स्वत:च्या कुटूंबासाठी केला. आज तालुक्यातील जनता आपल्या कामासाठी तहसिल कार्यालय, पोलीस स्टेशन, वीजमंडळ, पंचायत समिती, या सह अन्य शासकीय कार्यालयात गेल्यावर त्यांना पैसे दिल्याशिवाय त्यांचे काम होत नाही. एका कामासाठी चार चकरा मारुनसुध्दा ही कामे होत नाहीत. मात्र हे चित्र बदलण्यासाठी तळागाळातील संघटनेच्या कार्यकर्त्याला जर सत्तेमध्ये बसवून काम करण्याची संधी दिली तर सर्वसामान्याचे प्रश्न सुटल्या शिवाय राहणार नाहीत. त्यासाठी संघटनेच्या माध्यमातून उभा करण्यात आलेल्या उमेदवारांच्या पाठीशी भक्कमपणे उभे रहावे असेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी तालुक्यातील परांपराकी राजकीय गटाच्या नेत्यांचा त्यांनी खरपूस समाचार घेतला.
या मेळाव्यामध्ये तात्या भोसले, नितीन जगताप, अतुल राऊत, दत्ता कोकणे, दिपाली ढेरे, शरद एकाड, वैभव मस्के, पांडू भोसले, बालाजी तरंगे, किशोर शिंदे, रामराजे ढोलारे, अक्षय देवडकर, स्वातीताई जाधव, गणेश वायभासे आदिंची भाषणे झाली.
यावेळी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन राणा महाराज वाघमारे यांनी केले. तर आभार शरद एकाड यांनी मानले.
या मेळाव्यासाठी शेकडोच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थितीत होते.

saptahikpawanputra

Recent Posts

ग्रामीण विद्यार्थ्यांच्या इंग्रजी अभिव्यक्तीला जिल्हास्तरीय व्यासपीठ* *लोकशिक्षिका स्व. लीलाताई दिवेकर यांच्या स्मरणार्थ करमाळ्यात उद्या वक्तृत्व स्पर्धा

करमाळा प्रतिनिधी भाषा ही केवळ परीक्षेतील गुणांची बाब नसून विद्यार्थ्यांच्या विचारांना आकार देणारे आणि जगाशी…

6 hours ago

मानव एकता दिनानिमित्त संत निरंकारी मंडळाच्या शिबीरात १६६ जणांचे रक्तदान*

करमाळा प्रतिनिधी - मानव एकता दिनानिमित्त संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशन दिल्ली शाखा करमाळा यांचे वतीने…

1 day ago

जयकुमार गोरे यांच्यावरील आक्षेपार्ह वक्तव्याचा करमाळ्यात भाजपकडून तीव्र निषेध

  करमाळा प्रतिनिधी :- महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायत राजमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री मा.…

2 days ago

नाशवंत गोष्टीकडे दुर्लक्ष करून शाश्वत गोष्टी लक्षात घेवून युवकांनी समाजकारण व राजकारणातून जनतेची सेवा करावी . – मा .आ जयवंतराव जगताप

करमाळा प्रतिनिधी दिग्वीजय बागल यांची ' मूख्यमंत्री बळीराजा पाणंद/ शेत रस्ता समिती च्या करमाळा विधानसभा…

2 days ago

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त करमाळ्यात गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

  करमाळा प्रतिनिधी : मुक्ता साळवे शैक्षणिक अभियान, करमाळा यांच्या वतीने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे…

2 days ago

शासकीय कामकाजाचे प्रत्यक्ष धडे! ‘नामसाधना’च्या चिमुकल्यांनी स्वतः अर्ज लिहून मांडल्या समस्या; मुख्याधिकाऱ्यांकडून कौतुक

करमाळा (प्रतिनिधी): विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता त्यांना लहानपणापासूनच दैनंदिन जीवन, प्रशासकीय कामकाज, शासकीय…

3 days ago