राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्रातील 11 कोटी जनतेची माफी मागावी- युवासेना माजी समन्वयक शंभुराजे फरतडे यांची मागणी

 

करमाळा प्रतिनिधी
मुंबई आणि  ठाण्याच्या विकासात आणि विशेषतः मुंबईला देशाची आर्थिक राजधानी बनवण्यात राजस्थानी–गुजराथी समाजांचे योगदान उल्लेखनीय आहे, असं विधान राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलं. मुंबईतून गुजराती आणि राजस्थानी लोक निघून गेले तर या शहराला कोणी आर्थिक राजधानी म्हणणार नाही, अशा आशयाचं वक्तव्य त्यांनी यादरम्यान केलं. दरम्यान, त्यांच्या या वक्तव्यावरून नव्या वादाला तोंड फुटलं आहे. त्यांच्या या वक्तव्यावर अनेकांकडून टीका होत आहे.दरम्यान करमाळ्यात देखील या वक्तव्याचे पडसाद उमटले असून युवासेनेचे माजी तालुका समन्वयक शंभूराजे फरतडे यांनी राज्यापाल भगतसिंग कोश्यारी यांचा तिव्र शब्दात निषेध केला आहे.

प्रसिद्ध दिलेल्या पत्रकात फरतडे यांनी म्हटले आहे की
राज्यपाल कोश्यारी यांचे वक्तव्य हे महाराष्ट्रातील मराठी माणसांचा अपमान करणारे असुन राज्यपाल यांचा करावा तेवढा निषेध कमी असल्याचे म्हटले आहे.महाराष्ट्रच्या व मुंबई च्या जडणघडणीत अमूल्य असे योगदान व त्याग केलेल्या विरांचा हा अपमान आहे. राज्यपाल पद हे घटनात्मक दर्जाचे पद असताना महाराष्ट्रात राजकीय धार्मिक, प्रांतीक अस्थिरता निर्माण करण्यासाठी कोश्यारी हे जाणीवपूर्वक वादग्रस्त वक्तव्य करत आहेत. त्यामुळेच कधी नव्हे ती राज्यपाल पदावरील व्यक्तीवर टिका करण्याची वेळ महाराष्ट्रातील जनतेवर आली आहे.ते राज्यपाल कमी परंतु भाजपाचे प्रवक्ते असल्यासारखी विधाने करत आहेत. मंत्री मंडळ शपथविधी, असो राज्यपाल नियुक्त आमदार निवड असो त्यांनी भाजपाला पुरक अशी भुमीका घेतली आहे.आज मुंबई वर केलेल्या वक्तव्याने त्यांचा महाराष्ट्रा द्वेष दिसुन आला आहे.महाराष्ट्रा बद्दल एवढाच द्वेष असेल तर त्यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल पद सोडावे व गुजराती, राजस्थानी चे ब्रँड अम्बेसिडर व्हावे असे देखील फरतडे यांनी म्हटले असून राज्यपाल यांनी महाराष्ट्रातील 11 कोटी मराठी बांधवाची माफी मागावी अन्यथा शिवसेना युवासेना तिव्र आंदोलन करेल असा इशाराच फरतडे यांनी दिला.

saptahikpawanputra

Recent Posts

छत्रपती शिवाजी महाराज यांचा आश्वारूढ पुतळयाचे भूमिपूजन पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या शुभहस्ते होणार – मोहिनी संजय सावंत, नगराध्यक्षा करमाळा नगर परिषद

करमाळा प्रतिनिधी : करमाळा शहर व तालुक्यातील सर्व शिवप्रेमींची गेल्या अनेक वर्षांपासूनची बहुप्रतिक्षित इच्छा आता…

19 hours ago

जेऊरमध्ये महावितरणविरोधात बळीराजाचा एल्गार; करमाळा तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांच्या नेतृत्वाखाली विराट धरणे आंदोलन

​जेऊर (प्रतिनिधी): करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा विस्कळीत वीजपुरवठा आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज विजेच्या लपंडावाविरोधात आज…

21 hours ago

करमाळा तालुक्यात महावितरणविरोधात संतापाचा भडका: जेऊर कार्यालयासमोर १८ सप्टेंबरला भव्य धरणे आंदोलन; शंभूराजे जगताप यांचे शेतकऱ्यांना एकत्र येण्याचे आवाहन

​करमाळा: प्रतिनिधी  करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा वीजपुरवठा सातत्याने खंडित करणे आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज वीज…

2 days ago