शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर राजकीय द्वेषापोटी शिवसेनेचा आवाज दाबण्यासाठी ईडीचा विरोधकाकडुन गैरवापर- शाहुदादा फरतडे मा.तालुकाप्रमुख शिवसेना

करमाळा शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर राजकीय द्वेषापोटी व शिवसेनेचा आवाज दाबण्यासाठी ईडी ला हाताशी धरून झालेल्या कारवाईचा शिवसेना माजी तालुकाप्रमुख शाहुराव फरतडे यांच्या नेतृत्वाखाली करमाळा येथे निषेध करुन शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांना समर्थन देण्यात आले.यावेळी बोलतना माजी तालुकाप्रमुख शाहुराव फरतडे म्हणाले कि ईडीचा धाक दाखवून आमदार फोडून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदावरुन पायउतार करुन सुद्धा शिवसेनेला राज्यभरातून मिळत असलेल्या तुफान प्रतिसादा मुळे भाजपाच्या पायाखालची वाळू सरकली असून आत्ता संजय राऊत यांना अटक करुन शिवसेनेचा व उद्धव ठाकरे यांचा आवाज दाबण्याचे काम करत आहेत. मात्र या बोगस कारवाईत ईडी च्या हाती काय लागलणार नसून संजय राऊत लवकरच ईडीवर विजय मिळवून पुन्हा सक्रिय होतील असा विश्वास व्यक्त केला.या वेळेस बच्चा बच्चा जानता है संजय राऊत सच्चा है! संजय राऊत तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है ! आवाज कुणाचा शिवसेनेचा या घोषणांनी जिन मैदान परिसर गजबजून गेला होता.या वेळेस शिवसेना शाखाप्रमुख उत्तम हनपुडे, शिवसैनिक शिवाजीराव माने ,शहाजीराव धेंडे, कालिदास कदम, अभिमन्यू लोकरे, नितीन जगताप, संतोष वायकर,  ए एस माळी आदी शिवसैनिक उपस्थित होते.

saptahikpawanputra

Recent Posts

यशवंत शिंदे यांची नेमबाजी स्पर्धेत सुवर्णपदकाला गवसणी! ४१ व्या महाराष्ट्र राज्य नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदकमाढा तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा

करमाळा प्रतिनिधी  निमगाव (टें.) येथील आदर्श सरपंच तथा विठ्ठल कॉर्पोरेशनचे कार्यकारी संचालक श्री. यशवंत संजयमामा…

20 mins ago

प्राचार्य बाळासाहेब नरारे यांना पुरी (ओडिशा) येथे ‘सुकुमारी स्वरमनी’ पुरस्काराने सन्मानित

करमाळा प्रतिनिधी करमाळा  येथील कमलाभवानी बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष तथा सुरताल संगीत विद्यालयाचे प्राचार्य श्री. बाळासाहेब…

6 hours ago

करमाळा शहरातील दगडी रोड येथील रहिवासी शारदा पिसे दुःखद निधन

करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील दगडी रोड येथील रहिवासी शारदा सुरेश पिसे (वय ७१) यांचे अल्पशा…

23 hours ago

लोकशाही बचाव अराजकता हटाव सोलापूरच्या भाजप मोर्चाच्या नियोजनासाठी भाजप जिल्हा युवा नेते दिग्विजय बागल यांच्या उपस्थितीत करमाळ्यात १ नोव्हेंबरला बैठक- सचिन पिसाळ

करमाळा प्रतिनिधी काँग्रेस इंडी आघाडी आणि डाव्या पक्षांकडून भारतीय जनता पक्षाविरोधात खोटा प्रचार करून पक्षाची…

6 days ago

दुष्काळ व पाणीटंचाई संदर्भातील बैठक आमदार.नारायण (आबा)पाटील यांनी जेऊर येथे न घेता करमाळा येथे पंचायत समिती सभागृहात घ्यावी- ॲड. अजिनाथ विघ्ने उपसभापती पं.स.करमाळा

करमाळा प्रतिनिधी  करमाळा तालुक्याची दुष्काळ निवारण व पाणीटंचाई आढावा बैठक आमदार. नारायण( आबा) पाटील यांचे…

1 week ago

डॉ अजिंक्य पवार यांची एम.डी. परीक्षेत यशस्वी भरारी; जनरल मेडिसिनमध्ये पदव्युत्तर पदवी संपादन डॉ. रविकिरण पवार कुटुंबीयांचा अभिमान उंचावला सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव

करमाळा : प्रतिनिधी मेहनत, जिद्द, सातत्यपूर्ण अभ्यास आणि ध्येयाप्रती असलेल्या निष्ठेच्या जोरावर डॉ. अजिंक्य रविकिरण…

1 week ago