मोरवड ता.करमाळा येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली.त्यावेळी महापुरुषांच्या प्रतीमांना पुष्पहार घालून अभिवादन करताना असंघटित मजूर संघटनेचे प्रणेते व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आ कामगार आघाडीचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष मा.यशवंतभाऊ गायकवाड , गावातील प्रतीष्ठीत हनुमंत नाळे, महेश काळे पाटील,अक्षय कांबळे,आयाश कबीर, कांतीलाल राऊत,बाळू दिवटे, निसर्ग उपचार तज्ञ डॉ किरण गायकवाड,ज्ञानेश्वर गायकवाड, संविधान गायकवाड, शंकर गायकवाड यांनी अभिनंदन केले.
त्यावेळी बोलताना गायकवाड म्हणाले,आण्णाभाऊ साठेंनी आयुष्यभर आपल्या शाहिरीच्या माध्यमातून समाज परिवर्तन करण्याचा संदेश दिला.त्याचबरोबर शोषित पिडीत कष्टकरी, कामगार,व शेतमजूरांच्या व्यथा ऐरनीवर मांडण्याचा प्रयत्न केला, संयुक्त महाराष्ट्र चळवळीत आण्णाभाऊंचे कार्य महत्त्वाचे आहे.एव्हढेच नाही ,तर 15ऑगष्ट 1947 ला मिळालेल्या तथाकथित स्वातंत्याचा धिक्कार करत व शोषित पिडीत कष्टकरी शेतमजूरांच्या व्यथा मांडण्यासाठी ललकारी दिली “” ये आझादी झुठी हैं/देश की जनता भूकी है.”आण्णाभाऊ साठेंनी पुरोगामी तत्वांची प्रेरणा जरी कमिनिष्ठांकडून घेतली असली तरी, नंतर त्यांच्या लक्षात आलं इथं वर्णभेद नाही तर जातीभेद आहे.म्हणून त्यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेल्या कार्याला भारावून जावून आपली फकिरा कादंबरी बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याला समर्पीत केली.व त्यानी समाजाला संदेश दिला “जग बदल घालून घाव,सांगून गेले मला भीमराव “त्यावेळी कार्यक्रमाचे आयोजन बापू दिवटे, गणेश दिवटे, नाना दिवटे, अनिल दिवटे,दत्ता दिवटे, संतोष दिवटे, हनुमंत दिवटे, यांनी केले.त्यावेळी तात्या राऊत,बबन झगडे,अर्जुंन कांबळे, देवीदास नाळे, रियाज मुलानी,मुन्नीर कबीर,लक्ष्मण निंबाळकर, जालिंदर काळे, करणं कांबळे, सुलतान कबीर, मनोज कांबळे,समीर कबीर, संतोष अदलिंगे,विक्रम राऊत, पांडुरंग अदलिंगे,हर्षद काळे,विशाल व्यवहारे,अक्षय शिंदे, कालिदास व्यवहारे, सचिन मोहळकर सर,फुलनाथ कांबळे उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसचालन बापू दिवटे यांनी केले तर कार्यकर्त्यांच्या शेवटी अभार राऊत सर यांनी केले.
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील ज्ञानसेवा सोशल फाउंडेशन संचलित ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा यांच्या ४ थ्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील उद्योजक क्लासिक कंपनीचे मालक अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचे करमाळा…
करमाळा प्रतिनिधी निमगाव (ह) येथे बुधराणी हॉस्पिटल पुणे व आधार बहु. उद्दे. संस्था, व कर्मवीर…