करमाळा प्रतिनिधी
करमाळा शहर व तालुक्यात दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी नागपंचमी साजरी करण्यात आली होती.
प्रथम मंदीराचे पुजारी रामचंद्र दळवी,भैय्या दळवी, महेश दळवी,सागर दळवी,जयंत दळवी यांच्या निवासस्थानी नागोबाच्या प्रतिमेची आरती करण्यात आली होती त्यानंतर किल्ला विभाग येथीलच घारीच्या गणपतीचे दर्शन घेऊन प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली होती फटाक्यांची आतषबाजी बँड पथकाच्या वाजत गाजत मिरवणूक किल्ला वेस येथील हनुमान मंदिराला प्रदक्षिणा घालून शहरातील मुख्य रस्त्याने मिरवणूक प्रसंगी महिला नागरिक दर्शन घेत होते प्रतिमा रावगाव रोडवरील मंदिरात ठेवण्यात आली होती दिवसभर भाविकांनी मोठी गर्दी केली होती सायंकाळी तर गर्दी अधिक झाली होती मंदीर परिसरात खेळण्याचे ,वडापाव, भेळ,पावभाजीचे गाडे उभा होते तथे छोटे बालगोपाळांसह मोठे नागरीकांनी आनंद घेतला होता तसेच दिवसभर मुल पंतग वावडी आदी उडवत टेप लाऊन आनंद घेत होती मंदिर परिसरात नागनाथ मित्र मंळाच्या युवकांनी चांगले नियोजन केले होते तसेच दुसऱ्यादिवशी त्यांनी भंडाऱ्याचे जेवण ठेवले होते .यावेळी एपीआय जगदाळे साहेब यांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता नागनाथ मित्र मंडळाचे व टायगर ग्रुपचे अध्यक्ष जालिंदर जाधव,सरपंच भोजराज सुरवसे यांनी योग्य नियोजन केले होते.
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील ज्ञानसेवा सोशल फाउंडेशन संचलित ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा यांच्या ४ थ्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील उद्योजक क्लासिक कंपनीचे मालक अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचे करमाळा…
करमाळा प्रतिनिधी निमगाव (ह) येथे बुधराणी हॉस्पिटल पुणे व आधार बहु. उद्दे. संस्था, व कर्मवीर…