कुरुहिनशेट्टी लिंगायत कोष्टी समाजाच्या करमाळा तालुका अध्यक्षपदी गजेंद्र गुरव तर उपाध्यक्षपदी आनंद न्हावकर यांची निवड

 

करमाळा प्रतिनिधी : कुरूहिनशेट्टी लिंगायत कोष्टी समाजाच्या करमाळा तालुका अध्यक्षपदी गजेंद्र गुरव तर उपाध्यक्षपदी आनंद न्हावकर यांची निवड करण्यात आली. त्याचबरोबर खजिनदारपदी सचिन माहूले, सचिवपदी जयंत कोष्टी यांची निवड करण्यात आली.
ह्या निवडी करमाळा येथे आयोजित बैठकी दरम्यान करण्यात आल्या.
भविष्यामध्ये कोष्टी समाजाचा विकास व्हावा तसेच कोष्टी समाजाचे विविध प्रश्न मार्गी लावण्याचे काम हाती घेणार असल्याचे निवडी नंतर नवनियुक्त अध्यक्ष गजेंद्र गुरव यांनी सत्काराला उत्तर देताना आपले मत व्यक्त केले.
करमाळा कोष्टी समाज राज्यामध्ये उल्लेखनीय सामाजिक कार्य करणार असून;सर्वांना सोबत घेऊन विविध उपक्रम राबवणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी कुरूहिनशेट्टी लिंगायत कोष्टी समाज महाराष्ट्र राज्य युवा कार्यकारणी सदस्य सतीश शहापूरे यांनी समाजाला मार्गदर्शन केले.
यावेळी जेष्ठ कार्यकर्ते सुरेश राक्षे, विजय राक्षे, भारत माहूले, राजेद्र माहूले, दिपक न्हावकर, राजेंद्र गुंजेगावकर, सचिन माहूले, उमेश माहूले, पिंटू माहूले, अमोल कुर्हे , शिवाजी माहूले, नंदकुमार हुंदाडे, निलेश राक्षे, ह.भ.प. कानिफनाथ आगम सर उपस्थित होते.

saptahikpawanputra

Recent Posts

ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटचे संस्थापक प्रा.डॉ महेश निकत यांची मेस्टा सोलापूर जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

  करमाळा प्रतिनिधी : महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशन (MESTA) यांच्या वतीने शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय…

1 day ago

करमाळा भाजपा शहर उपाध्यक्षपदी कपिल मंडलिक यांची निवड

  करमाळा प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टी करमाळा शहराच्या उपाध्यक्षपदी युवा कार्यकर्ते तथा भाजपाचे निष्ठावान…

2 days ago

छत्रपती शिवाजी महाराज यांचा आश्वारूढ पुतळयाचे भूमिपूजन पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या शुभहस्ते होणार – मोहिनी संजय सावंत, नगराध्यक्षा करमाळा नगर परिषद

करमाळा प्रतिनिधी : करमाळा शहर व तालुक्यातील सर्व शिवप्रेमींची गेल्या अनेक वर्षांपासूनची बहुप्रतिक्षित इच्छा आता…

3 days ago

जेऊरमध्ये महावितरणविरोधात बळीराजाचा एल्गार; करमाळा तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांच्या नेतृत्वाखाली विराट धरणे आंदोलन

​जेऊर (प्रतिनिधी): करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा विस्कळीत वीजपुरवठा आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज विजेच्या लपंडावाविरोधात आज…

3 days ago