राज्यातील अनेक धरणे भरत आली आहेत. मात्र अद्याप करमाळा तालुक्यातील अनेक तलाव कोरडे आहेत. निम्मा पावसाळा संपत आला आहे त्यामुळे ओहोरफ्लोच्या पाण्याने करमाळा तालुक्यातील कुकडी धरण लाभक्षेत्रात येणारे तलाव भरून घेण्यात यावेत, अशी मागणी करत वारे यांनी नगर- सोलापूर महामार्गावर रस्ता रोको आंदोलन केले होते. तेव्हा अधिकाऱ्यांनी सात दिवसाच्या आत पाणी देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार येथे पाणी आले आहे.संतोष वारे यांच्या या प्रयत्नाचे हे यश आले आहे, असे राष्ट्रवादी किसान सेलचे तालुकाध्यक्ष सचिन नलवडे पाटील यांनी सांगितले आहे.कामोणे येथे तलावात पाणी पूजन झाले तेव्हा उपसरपंच संदीप नलवडे, सोमनाथ भिसे, मधुकर जाधव, चिंटू भालेराव, औदुंबर नलवडे, अजय पवार, लक्ष्मण भालेराव, दीपक देवकते, कृष्णा भिसे, चंद्रकांत पवार, गणेश वाल्मिक शिंदे, सौरभ देमुंडे, पांडुरंग नलवडे, अशोक देवकते, तुळशीराम देमुंडे आदी यावेळी उपस्थित होते.
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील ज्ञानसेवा सोशल फाउंडेशन संचलित ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा यांच्या ४ थ्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील उद्योजक क्लासिक कंपनीचे मालक अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचे करमाळा…
करमाळा प्रतिनिधी निमगाव (ह) येथे बुधराणी हॉस्पिटल पुणे व आधार बहु. उद्दे. संस्था, व कर्मवीर…