करमाळा- करमाळा शहरातील तहसिल,तलाठी व मंडल कार्यालयाच्या नवीन इमारतीस निधी मिळावा यासाठी करमाळा तालुका काँग्रेस आयचे तालुकाध्यक्ष प्रतापराव जगताप यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले असुन लवकरच उपलब्ध असलेल्या शासकीय जागेमध्ये भव्य दिव्य इमारत उभी रहाणार आहे.दिनांक ८ एप्रिल 2022 रोजी महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन महसुल मंत्री ना.बाळासाहेब थोरातसाहेब यांच्याकडे स्वता जाऊन श्री जगताप यांनी सदर इमारती या इंग्रजांच्या काळातील असुन सध्या त्या इमारती अत्यंत धोकादायक अवस्थेत झालेल्या असुन एखादी दुर्घटना घडु नये यासाठी लवकरात लवकर नवीन इमारत उभा करण्यात यावी यासाठी ना.थोरात साहेबांकडे मागणी केली होती.या केलेल्या मागणीला यश आले असुन शासनाच्या जा.क्र. साशा/संकीर्ण -1ब/आर आर 502/2022 या पत्राद्वारे अर्थिक निधीची तरतुद करणेबाबत सुचित केले असल्याबाबतचे निवासी उपजिल्हाधिकारी यांना पत्राद्वारे अवगत केलेले आहे.
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील ज्ञानसेवा सोशल फाउंडेशन संचलित ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा यांच्या ४ थ्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील उद्योजक क्लासिक कंपनीचे मालक अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचे करमाळा…
करमाळा प्रतिनिधी निमगाव (ह) येथे बुधराणी हॉस्पिटल पुणे व आधार बहु. उद्दे. संस्था, व कर्मवीर…