करमाळा आगारामध्ये पोलीस नियंत्रण कक्ष स्थापन तालुका प्रमुख प्रियांका गायकवाड यांच्या मागणीला यश

 


करमाळा प्रतिनिधी – करमाळा आगार हे चार जिल्हयांच्या सिमेवर असणारे सर्वात मोठे आगार आहे. सदर आगारामध्ये चारही जिल्हयातील प्रवाशांची वर्दळ असते. करमाळा आगारामध्ये सध्या चोरीचे व विद्यार्थिनीना छेडण्याचे प्रमाण खूप वाढलेले आहे. त्यामुळे विद्यार्थीनी व प्रवासी हैराण झालेले असून करमाळा शहराचे नांव या भुरटया चोरांमुळे व रोडरोमिओमुळे बदनाम होत आहे याकरीता करमाळा आगारामध्ये पोलिस नियंत्रण कक्ष स्थापन करावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा वजा मागणी आगार व्यवस्थापक रा.प. करमाळा आगार, करमाळा यांना लेखी निवेदनाव्दारे शिवसेना तालुका प्रमुख प्रियांका गायकवाड यांनी नुकतीच केली होती.
सदर मागणी आगाराच्या व्यवस्थापक अश्विनी किरगत यांनी पूर्ण केली असून एस टी डेपोमध्ये पोलिस नियंत्रण कक्षाचे अनावरण शिवसेना जिल्हाप्रमुख आशा टोणपे, सहाय्यक पोलिस निरीक्षक जगदाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.
याप्रसंगी आगार प्रमुखांचा, सहायक पोलिस निरीक्षक जगदाळे व निर्भया पथकाचे अधिकारी यांचा सन्मान शिवसेना महिला आघाडी, युवा सेनेच्या वतीने करण्यात आला.
याप्रसंगी शिवसेना जिल्हा प्रमुख आशा टोणपे म्हणाल्या की, शिवसेना महिला आघाडी ही नेहमीच जनतेच्या विविध प्रश्नांसाठी तत्पर असून कोणत्याही महिलेवर कोणताही बाका प्रसंग उद्भवल्यास त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा आम्ही आपल्या पाठीशी ठामपणे उभा राहू तसेच या पुढे करमाळा आणि माढा शिवसेना महिला आघाडीचे काम दैदिप्यमान असे असेल असे आश्वासन टोणपे यांनी उपस्थित प्रवासी व विद्यार्थिनींना दिला.
तसेच पुढे बोलताना गायकवाड म्हणाल्या की, आगाराने सदरची मागणी पूर्ण करून विद्यार्थीनी छेडछाडीच्या व चोरीच्या प्रकरणाला आळा घालण्यासाठी मोठी मदत केली आहे. परंतु पोलीस प्रशासनाने सुध्दा पूर्ण वेळ या ठिकाणी सतर्कता ठेवणे गरजेचे आहे. त्यामुळे प्रवाशांचा प्रवास ही सुखकर व सुरक्षित वातावरण पार पडेल.
यावेळी रेखा परदेशी व विद्यार्थिनींनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, शिवसेना महिला आघाडीच्या वतीने जो पोलीस नियंत्रण कक्ष स्थापन झाला आहे त्यामुळे यापुढे कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही.
यावेळी युवा सेना जिल्हा उपप्रमुख मयूर यादव, युवा सेना तालुका प्रमुख राहुल कानगुडे, तालुका सम्वयक दादासाहेब तनपुरे, शहर प्रमुख विशाल गायकवाड, उपशहर प्रमुख अविनाश भिसे, प्रसाद निंबाळकर, समीर हलवाई, रेखा परदेशी, भक्ती गायकवाड, सिमरन पठाण, सविता सुरवसे, शिवानी जाधव, कार्तिकी ढोके यांचे सह एस टी डेपोतील बहुसंख्य प्रवासी व विद्यार्थिनी उपस्थित होत्या.

saptahikpawanputra

Recent Posts

करमाळ्यात रविवारी २९ डिसेंबरला होणार भव्य ग्लोबल टॅलेंट सर्च परीक्षा २०२४-२५

करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील ज्ञानसेवा सोशल फाउंडेशन संचलित ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा यांच्या ४ थ्या…

18 hours ago

२७ डिसेंबर रोजी करमाळ्यात कमलाई कृषी प्रदर्शन… निर्यातक्षम केळी व डाळिंब या विषयावरती परीसंवादाचे आयोजन… शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे पाणी फाउंडेशनचे आवाहन

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…

2 days ago

आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्था करमाळा आयोजित जाधव -पाटील हॉस्पिटलमध्ये 6 व्या मुळव्याधसंबंधी शिबिराची यशस्वी सांगता

करमाळा प्रतिनिधी  करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…

3 days ago

पंढरपूर येथे श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीच्यावतीने उद्योजक संतोष काका कुलकर्णी यांचा सहकुटुंब सत्कार

करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील‌ उद्योजक क्लासिक कंपनीचे ‌ मालक ‌ अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचे करमाळा…

3 days ago

निमगाव (ह )येथे मोफत नेत्र तपासणी शिबिर अल्पदरात चष्म्याचे वाटप

करमाळा प्रतिनिधी निमगाव (ह) येथे बुधराणी हॉस्पिटल पुणे व आधार बहु. उद्दे. संस्था, व कर्मवीर…

3 days ago