करमाळा प्रतिनीधी करमाळा येथे विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांची सातारा जिल्हा भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस व माढा लोकसभा संयोजक जयकुमार शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली, संपन्न झाली यावेळी मंडल अध्यक्ष गणेश चिवटे , शहराध्यक्ष जगदीश अग्रवाल, माढा लोकसभा मतदारसंघाचे विस्तारक शरद झेंडे, तालुका उपाध्यक्ष रामभाऊ ढाणे उपस्थित होते, यावेळी बोलताना माढा लोकसभा संयोजक जयकुमार शिंदे म्हणाले की भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून माढा लोकसभा व करमाळा विधानसभा मतदारसंघांमध्ये बूथ सशक्तीकरण अभियान संपूर्ण तालुक्यामध्ये पूर्ण ताकत नी राबविण्यात यावे ज्या बुधवर आपल्याला मतदान कमी झाले आहे ते का व त्याची कारणे शोधून त्या बुथवर काम करायचे आहे 2024 च्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचा खासदार मोठ्या मताधिक्याने निवडून येण्यासाठी व विधानसभेला भाजपचा झेंडा फडकण्यासाठी सर्वांनी कामाला लागावे असे सूचना देण्यात आले. त्यांनी विस्तृतपणे बूथ सशक्तिकरण अभियान काय आहे याची माहिती दिली देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या संकल्पनेतून संपूर्ण भारतामध्ये हे बुथ अभियान राबविले जात आहे ज्या संयोजकांना बुथ दिले आहेत त्यांनी प्रवास करून त्या गावातील प्रमुख पदाधिकारी प्रमुख नेते शक्ती केंद्रप्रमुख बूथ प्रमुख यांच्याशी बैठक करून त्या गावातील संपूर्ण माहिती घेऊन प्रत्येक घरामध्ये जाऊन भारतीय जनता पक्षाने केलेले काम केंद्र व राज्य सरकारने ज्या योजना राबवल्या आहेत तसेच मतदार संघाचे खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांनी केलेल्या कामाची संपूर्ण माहिती त्या घरोघरी जाऊन माहिती द्यावी तसेच केंद्र शासनाच्या ज्या योजनांचा लाभ घेतलेल्या लाभार्थींच्या भेटी घेऊन त्यांना पक्षाशी कशा पद्धतीने जोडता येईल त्या पद्धतीने प्रयत्न करावा तसेच बुथ अध्यक्ष यांना मेरा बुथ सबसे मजबूत हर बुथ भाजप युक्त चा नारा देत भारतीय जनता पक्षाची ताकद माढा लोकसभा व विधानसभा मतदारसंघांमध्ये ताकतीने वाढवण्याची विनंती केली यावेळी मंडलाध्यक्ष गणेश चिवटे यांनी हर घर तिरंगा योजने संदर्भात माहिती देऊन करमाळा विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक घरातील लोकांनी आपल्या घरावर तिरंगा ध्वज फडकवावा भारताच्या 75 व्या अमृत महोत्सवी वर्षामध्ये तसेच ज्यांनी देशासाठी बलिदान दिले त्यांचाही स्मरण यानिमित्त करावे असे आव्हान चिवटे यांनी केले यावेळी राज्य परिषद सदस्य बाळासाहेब कुंभार, तालुका सरचिटणीस काकासाहेब सरडे, श्याम सिंधी, धनंजय ताकमोगे,मोहन शिंदे, विजयकुमार नागवडे, बाळासाहेब हौसिंग, दादासाहेब देवकर, अमोल पवार, लक्ष्मण केकान, गणेश तळेकर, विकास कळसाईत,धर्मराज नाळे, नितीन निकम,प्रकाश ननवरे, भैया गोसावी, बल्लाळ सर,दादा पाठक, सुनील जाधव,फलटण तालुका युवा मोर्चाचे उपाध्यक्ष विशाल नलावडे, समाधान कांबळे, हनुमंत रणदिवे,मोहन शेंडे,सचिन गायकवाड, व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते प्रास्ताविक व आभार शहराध्यक्ष जगदीश अग्रवाल यांनी मानले..
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील ज्ञानसेवा सोशल फाउंडेशन संचलित ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा यांच्या ४ थ्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील उद्योजक क्लासिक कंपनीचे मालक अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचे करमाळा…
करमाळा प्रतिनिधी निमगाव (ह) येथे बुधराणी हॉस्पिटल पुणे व आधार बहु. उद्दे. संस्था, व कर्मवीर…