करमााळा प्रतिनिधी
करमाळा तालुक्याचे विकासप्रिय आमदार संजयमामा शिंदे यांच्या 54 व्या वाढदिवसानिमित्त करमाळा उपजिल्हा रुग्णालय येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये 89 रक्तदात्यांनी रक्तदान केले तर चिखलठाण येथे आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरामध्ये 37 रक्तदात्यांनी रक्तदान केले. दिवसभरात एकूण 127 रक्तदात्यांनी आज रक्तदान केले.
करमाळा येथील रक्तदान शिबिराचे उद्घाटन करमाळा तालुक्याचे तहसीलदार मा. समीरजी माने साहेब, पोलीस निरीक्षक सूर्यकांतजी कोकणे साहेब ,गटविकास अधिकारी मनोजजी राऊत साहेब यांचे शुभ हस्ते करण्यात आले.
आमदार संजयमामा शिंदे यांनी उपजिल्हा रुग्णालय करमाळा येथील रक्तदान शिबिराला भेट देऊन पाहणी केली. यावेळी उद्धव दादा माळी, दादासाहेब जाधव, सुभाष अभंग, चंद्रहास निमगिरे, महेश सोरटे ,चंद्रकांत काका सरडे ,विलास पाटील ,राजेंद्र पवार ,रवींद्र वळेकर,सुजित तात्या बागल, एड. राहुल सावंत ,तात्यासाहेब मस्कर, समाधान दौंड, संजय जाधव , जगदाळे साहेब, अशपाक जमादार, बापू काळे , तुषार शिंदे, सुरज ढेरे , डॉ. विकास वीर आदी उपस्थित होते.
चिखलठाण नंबर 1 येथे आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात 37 रक्तदात्यांनी रक्तदान केले. या शिबिराचे उद्घाटन माढा विधानसभा मतदारसंघाचे आ. बबनदादा शिंदे यांचे शुभहस्ते करण्यात आले. यावेळी राजेंद्रकुमार बारकुंड यांचेसह तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील ज्ञानसेवा सोशल फाउंडेशन संचलित ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा यांच्या ४ थ्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील उद्योजक क्लासिक कंपनीचे मालक अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचे करमाळा…
करमाळा प्रतिनिधी निमगाव (ह) येथे बुधराणी हॉस्पिटल पुणे व आधार बहु. उद्दे. संस्था, व कर्मवीर…