करमाळा प्रतिनिधी देशाला व राज्यालाही कोणी वाली राहीलाच नाही अशी चिंताजनक परिस्थिती आज निर्माण झालेली असल्याची खंत सोलापुर जिल्हा युवक काँग्रेस आयचे जिल्हाध्यक्ष सुनंजय पवार यांनी करमाळा येथे व्यक्त केली.यावेळी तालुकाध्यक्ष प्रतापराव जगताप उपस्थित होते. अखिल भारतीय काँग्रेस आय पक्षाच्या वतीने आज देशात,राज्यात वाढत असलेली महागाई, बेरोजगारी,अग्निपथ योजना, जीवनाश्यक वस्तुवरील वाढवलेली जी.एस.टी.तसेच या वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतपिकाचे नुकसान भरपाई म्हणुन प्रती हेक्टरी 75000/- रुपये मिळावी.या वर्षीचे पीक कर्ज माफ करावे,फळ बागायतदारांना भरीव मदत मिळावी.खरडुन गेलेल्या व गाळ साचलेल्या शेतजमिनीच्या दुरुस्तीसाठी ठोस मदत मिळावी याचे निवेदन आज करमाळा तहशिलदारांना देण्यात आले.यावेळी श्री प्रतापराव जगताप यांनी बोलताना सांगितले की अगोदरच शेतकरी दुबार-तिबार पेरणीने डबघाईस आला असुन अतिवृष्टीमुळे पूर्णतः कोलमडुन पडला आहे.देशात अग्निपथ योजना जाहीर करुन यात देशाची खुप मोठी हानी होणार आहे.आज ६० रु प्रतीलिटर मिळणारे पेट्रोल शंभरीपार गेले आहे.अनेक वस्तुंच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत.राज्यात दोन मंत्र्यांचे सरकार ठोस निर्णय घ्यायला तयार नाही.या सर्व गोष्टीमध्ये सामान्य माणुस भरडला जात आहे.यामुळे आम्ही पक्षाच्या वतीने केलेल्या मागण्या लवकरत लवकर जर मान्य नाही केल्या तर आमच्या पक्षाच्या वतीने त्रीव आंदोलन छेडण्यात येणार असल्याचा इशाराही या निवेदनात देण्यात आला आहे.यावेळी अल्पसंख्यांक विभागाचे तालुकाध्यक्ष जावेदभाई शेख,तालुका सचिव जैनुदीन शेख,तालुका सरचिटणीस संभाजी शिंदे,अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हाउपाध्यक्ष दस्तगीर पठाण,अतुल मारकड,भिमराव ओहोळ,सोमनाथ अवघडे,कौसर पठाण,किरण वरवडे,मौला पठाण,अफजल पठाण,मुसा पठाण,मोहम्मद पठाण,बबलु चिंचकर,सुजय जगताप,योगेश राखुंडे, उत्तरेश्वर सावंत,आदी पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी युवक जिल्हाध्यक्ष सुनंजय पवार यांनी करमाळ्यात काँग्रेस पक्षाचे काम अतिशय चांगल्या पध्दतीने सुरु असल्याने त्यांनी सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.करमाळ्याचे कुलदैवत आईकमलाभवानी मातेचे दर्शन घेऊन काँग्रेस पक्षाला बळकटी मिळुन देशातील व राज्यातील जनतेची सेवा करण्याचे दिवस लवकरात लवकर येवो अशी प्रार्थना देवीचरणी व्यक्त केली.
करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…
सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…
करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…
* करमाळा प्रतिनिधी “भारतीय डाक विभागाच्या विविध बचत, विमा आणि आर्थिक सुरक्षा योजना ग्रामीण भागातील…
करमाळा प्रतिनिधी वीट (ता. करमाळा) येथील शेतातील पत्र्याच्या शेडमधून चोरीस गेलेला सोनालीका कंपनीचा ट्रॅक्टर आणि…
करगाळा (प्रतिनिधी) : तालुक्यातील श्री मकाई सहकारी साखर कारखान्याची सन २०२५-२६ या आर्थिक वर्षा…