वडशिवणे ग्रामपंचायतीवर बागल गटाची एक हाती सत्ता राजकारणात बागलगटाचे वर्चस्व कायम

करमाळा प्रतिनीधी वडशिवणे ग्रामपंचायतच्या बागल गटानी सात जागावर विजय मिळवुन एकहाती सत्ता मिळवली आहे.वडशिवणे ग्रामपंचायतीची मतमोजणी पाचव्या फेरीत होती. नऊ जागांसाठी येथे निवडणूक झाली. तीन प्रभागात येथे उमेदवार रिंगणात होते. बागल गट विरुद्ध जगताप गट अशी येथे लढत झाली असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले. या ग्रामपंचायतीवर बागल गटाचे वर्चस्व राहिले आहे. येथे बागल गटाला सात तर जगताप गटाला दोन जागा मिळाल्या आहेत.
बागल गटाकडून राजश्री जगदाळे, शारदा साळुंखे, उषा जगदाळे, कमल वाघमारे, अमोल उघडे, विशाल जगदाळे, रुपाली देवकर हे विजयी झाले आहेत. तर जगताप गटाचे रत्नाकर कदम व प्रसाद पाटक हे दोघेही एकजण 1 तर दूसरा उमेदवार 3 मताने विजयी झाले आहेत. येथे पराभूत झालेले बागल गटाचे उमेदवार यांनी फेर मतमोजणीची मागणी केली. त्यानंतर तहसीलदार समीर माने यांनी मागणीचा विचार करून फेर मतमोजणी करण्यास सांगितले. मात्र त्यातही त्यांचा पराभव झाला. यावेळी बागल गटाचे नेते दिग्विजय बागल हे स्वतः मत मोजणीच्या ठिकाणी आले होते. बागल गटाने या निम्मिताने राजकारणात आपले वर्चस्व सिध्द केले आहे. कार्यालयात मतमोजणी सुरु होती
चार टेबलवर आठ फेऱ्यांमध्ये तहसीलदार समीर माने यांच्या नियंत्रणाखाली ही मतमोजणी झाली. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

saptahikpawanputra

Recent Posts

वाढदिवसाचा आनंद शाळेसाठी; कुलकर्णी परिवाराची पाच हजारांची देणगी मल्हारच्या वाढदिवसानिमित्त राजुरी जिल्हा परिषद शाळेला मदतीचा हात

करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…

8 hours ago

नवलेखक-नवकवींसाठी रविवारी कार्यशाळा* समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळातर्फे आयोजन

सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…

21 hours ago

मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा पूर्ववत करा रश्मी बागल यांची पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांना भ्रमण ध्वनि द्वारे विनंती

  करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…

23 hours ago

करमाळा पोलिसांचा दणका ट्रॅक्टर चोरीचा छडा; ३.७५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत वीट येथील शेतातून ट्रॅक्टर लंपास; तांत्रिक तपासातून दोघे ताब्यात

करमाळा प्रतिनिधी वीट (ता. करमाळा) येथील शेतातील पत्र्याच्या शेडमधून चोरीस गेलेला सोनालीका कंपनीचा ट्रॅक्टर आणि…

1 day ago

श्री मकाई सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न

  करगाळा (प्रतिनिधी) : तालुक्यातील श्री मकाई सहकारी साखर कारखान्याची सन २०२५-२६ या आर्थिक वर्षा…

3 days ago