करमाळा प्रतिनिधी :- करमाळा शहरात तालुक्यातील बहुसंख्य नागरीक हे शहरामध्ये कोणत्या ना कोणत्या कारणांसाठी येत असतात. तसेच शहरामध्ये विविध शाळा, विदयालये, महाविदयालये असून विदयार्थ्यांची ही मोठी वर्दळ असते अशा परिस्थितीत करमाळा शहरात मोकाट जनावरांमुळे नागरिकांच्या जिवीताला धोका निर्माण झालेला आहे. त्यामुळे सदर मोकाट जनावरांचा नगरपरिषदेच्या वतीने तात्काळ बंदोबस्त करावा असे निवेदन युवा सेना शहर प्रमुख विशाल गायकवाड यांनी मुख्याधिकारी करमाळा नगरपरिषद यांना दिले.
पुढे बोलताना ते म्हणाले की मागील काही वर्षात याबाबत अनेक दुर्घटना घडलेल्या आहेत तसेच एका नागरिकाला यामध्ये जीवही गमवावा लागलेला आहे. तरीही नगरपरिषद या बाबीकडे गांभीर्य पूरक पाहत नाही. यापुढे जर कोणाच्या जीविताला मोकाट जनावरांमुळे धोका निर्माण झाला तर याची संपूर्ण जबाबदारी नगरपरिषदेची राहील. तरी याबाबत तात्काळ कार्यवाही करून मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा अन्यथा युवा सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा यावेळी गायकवाड यांनी दिला.
यावेळी युवा सेना तालुका प्रमुख राहुल कानगुडे, तालुका समन्वयक दादासाहेब तनपुरे, छत्रपती शासन ग्रुप महाराष्ट्र राज्य अध्यक्ष प्राणजित गवंडी, युवासेना शहर समन्वयक प्रसाद निंबाळकर, उपतालुका प्रमुख युवा सेना अशोक रणदिवे, हनुमंत रंधवे, समीर हलवाई, अविनाश भिसे, युवा सेना तालुका सचिव पांडुरंग ढाणे आदी जण उपस्थित होते
करमाळा प्रतिनिधी निमगाव (टें.) येथील आदर्श सरपंच तथा विठ्ठल कॉर्पोरेशनचे कार्यकारी संचालक श्री. यशवंत संजयमामा…
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील कमलाभवानी बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष तथा सुरताल संगीत विद्यालयाचे प्राचार्य श्री. बाळासाहेब…
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील दगडी रोड येथील रहिवासी शारदा सुरेश पिसे (वय ७१) यांचे अल्पशा…
करमाळा प्रतिनिधी काँग्रेस इंडी आघाडी आणि डाव्या पक्षांकडून भारतीय जनता पक्षाविरोधात खोटा प्रचार करून पक्षाची…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्याची दुष्काळ निवारण व पाणीटंचाई आढावा बैठक आमदार. नारायण( आबा) पाटील यांचे…
करमाळा : प्रतिनिधी मेहनत, जिद्द, सातत्यपूर्ण अभ्यास आणि ध्येयाप्रती असलेल्या निष्ठेच्या जोरावर डॉ. अजिंक्य रविकिरण…