करमाळा प््र््त््र््््र््त्््र््त््र््््र््त््र््त््र््््र््त्््र््त््र- येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात पाणी फाउंडेशन व महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने शेतकऱ्यांच्या शोले चित्रपटाचे प्रदर्शन करण्यात आले. या चित्रपट प्रदर्शनाचे उद्घाटन संस्थेचे सचिव विलासरावजी घुमरे सर , संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड , महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल. बी.पाटील , पाणी फाउंडेशनचे जिल्हा समन्वयक सत्यवान देशमुख , आशिष लाड , अजिंक्य गुरव यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.
यावेळी पाणी फाउंडेशनचे समन्वयक सत्यवान देशमुख यांनी पाणी फाउंडेशन शेतकऱ्याचा शोले हा चित्रपट विद्यार्थ्यांना दाखविण्या पाठीमागचा उद्देश स्पष्ट केला. सुरुवातीला विद्यार्थ्यांना कॅन्सर ट्रेनची फिल्म दाखवण्यात आली व त्यानंतर शेतकऱ्यांच्या शोले हा चित्रपट दाखवण्यात आला. त्यानंतर चित्रपटावर आधारित प्रश्नमंजुषा विद्यार्थ्यांसोबत घेण्यात आली.
यावेळी विद्यार्थ्यांनी प्रश्नांची अचूक उत्तरे दिली. विजेता विद्यार्थ्यांच्या अभिनंदन करण्यात आले.
यावेळी महाविद्यालयातील 2270 विद्यार्थ्यांना हा चित्रपट दाखवण्यात येणार आहे. चित्रपटाच्या माध्यमातून मिळालेल्या ज्ञानाचा वापर नक्कीच आम्ही आमच्या शेतात करू. अशी विद्यार्थ्यांनी ग्वाही दिली . यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य. एल. बी. पाटील यांनी आपले विचार विचार मांडताना पाणी फाउंडेशनचा हा अतिशय स्तुत्य उपक्रम असून शेतकऱ्यांनी व विद्यार्थ्यांनी या उपक्रमाचे अनुकरण करावे असे स्पष्ट केले.
तसेच या महाविद्यालयाच्या वतीने या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या गावांमध्ये विविध उपक्रम येणाऱ्या काळात राबविले जातील असे मत राष्ट्रीय सेवा योजना जिल्हा समन्वयक प्रा. लक्ष्मण राख यांनी व्यक्त केले. हा चित्रपट पाहण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना +2 स्तरचे स्वयंसेवक व महाविद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते .
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. एस. टी. शिंदे , डॉ. हरिदास बोडके , प्रा. आनंद शेळके , प्रा.पल्लवी टोणपे , प्रा. अनिता अंधोरे , प्रा. विष्णु शिंदे यांनी विशेष परिश्रम घेतले.
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील उद्योजक क्लासिक कंपनीचे मालक अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचे करमाळा…
करमाळा प्रतिनिधी निमगाव (ह) येथे बुधराणी हॉस्पिटल पुणे व आधार बहु. उद्दे. संस्था, व कर्मवीर…
करमाळा प्रतिनिधी छोटे छोटे भूखंड उपलब्ध व्हावे या मागणीसाठी आपण विशेष प्रयत्न केले असून उद्योग…