यशवंतराव चव्हाण महाविद्यालय व पाणी फाउंडेशन यांच्या मार्फत शेतकऱ्यांच्या शोले चित्रपटाचे प्रदर्शन

करमाळा – येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात पाणी फाउंडेशन व महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने शेतकऱ्यांच्या शोले चित्रपटाचे प्रदर्शन करण्यात आले. या चित्रपट प्रदर्शनाचे उद्घाटन संस्थेचे सचिव विलासरावजी घुमरे सर , संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड , महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल. बी.पाटील , पाणी फाउंडेशनचे जिल्हा समन्वयक सत्यवान देशमुख , आशिष लाड , अजिंक्य गुरव यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.
यावेळी पाणी फाउंडेशनचे समन्वयक सत्यवान देशमुख यांनी पाणी फाउंडेशन शेतकऱ्याचा शोले हा चित्रपट विद्यार्थ्यांना दाखविण्या पाठीमागचा उद्देश स्पष्ट केला. सुरुवातीला विद्यार्थ्यांना कॅन्सर ट्रेनची फिल्म दाखवण्यात आली व त्यानंतर शेतकऱ्यांच्या शोले हा चित्रपट दाखवण्यात आला. त्यानंतर चित्रपटावर आधारित प्रश्नमंजुषा विद्यार्थ्यांसोबत घेण्यात आली.
यावेळी विद्यार्थ्यांनी प्रश्नांची अचूक उत्तरे दिली. विजेता विद्यार्थ्यांच्या अभिनंदन करण्यात आले.
यावेळी महाविद्यालयातील 2270 विद्यार्थ्यांना हा चित्रपट दाखवण्यात येणार आहे. चित्रपटाच्या माध्यमातून मिळालेल्या ज्ञानाचा वापर नक्कीच आम्ही आमच्या शेतात करू. अशी विद्यार्थ्यांनी ग्वाही दिली . यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य. एल. बी. पाटील यांनी आपले विचार विचार मांडताना पाणी फाउंडेशनचा हा अतिशय स्तुत्य उपक्रम असून शेतकऱ्यांनी व विद्यार्थ्यांनी या उपक्रमाचे अनुकरण करावे असे स्पष्ट केले.
तसेच या महाविद्यालयाच्या वतीने या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या गावांमध्ये विविध उपक्रम येणाऱ्या काळात राबविले जातील असे मत राष्ट्रीय सेवा योजना जिल्हा समन्वयक प्रा. लक्ष्मण राख यांनी व्यक्त केले. हा चित्रपट पाहण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना +2 स्तरचे स्वयंसेवक व महाविद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते .
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. एस. टी. शिंदे , डॉ. हरिदास बोडके , प्रा. आनंद शेळके , प्रा.पल्लवी टोणपे , प्रा. अनिता अंधोरे , प्रा. विष्णु शिंदे यांनी विशेष परिश्रम घेतले.

saptahikpawanputra

Recent Posts

ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटचे संस्थापक प्रा.डॉ महेश निकत यांची मेस्टा सोलापूर जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

  करमाळा प्रतिनिधी : महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशन (MESTA) यांच्या वतीने शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय…

1 day ago

करमाळा भाजपा शहर उपाध्यक्षपदी कपिल मंडलिक यांची निवड

  करमाळा प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टी करमाळा शहराच्या उपाध्यक्षपदी युवा कार्यकर्ते तथा भाजपाचे निष्ठावान…

2 days ago

छत्रपती शिवाजी महाराज यांचा आश्वारूढ पुतळयाचे भूमिपूजन पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या शुभहस्ते होणार – मोहिनी संजय सावंत, नगराध्यक्षा करमाळा नगर परिषद

करमाळा प्रतिनिधी : करमाळा शहर व तालुक्यातील सर्व शिवप्रेमींची गेल्या अनेक वर्षांपासूनची बहुप्रतिक्षित इच्छा आता…

3 days ago

जेऊरमध्ये महावितरणविरोधात बळीराजाचा एल्गार; करमाळा तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांच्या नेतृत्वाखाली विराट धरणे आंदोलन

​जेऊर (प्रतिनिधी): करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा विस्कळीत वीजपुरवठा आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज विजेच्या लपंडावाविरोधात आज…

3 days ago