बेकायदेशीरऱित्या विनापरवाना चोरुन वाळु वाहतूक करणाऱ्याला वाहनासह पकडले.

करमाळा प्रतिनिधी. बेकायदेशीर ऱित्या विनापरवाना चोरुन वाळु वाहतूक करणाऱ्याला वाहनासह पकडले आहे करमाळा पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार पहाटेच्या वेळी टाकळी ते भिगवण रस्त्यावर हा वाळू वाहतूक करीत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर करमाळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी एक पथक त्या दिशेने रवाना केले. भीमा नदीतील पात्रातील वाळू चोरी करून वाहतूक करीत असताना एका व्यक्तीस टाकळी ते भिगवन जाणाऱ्या रस्त्यावर कोंढार चिंचोली भागातून जात असताना एकाला पोलिसांनी पकडले आहे. त्याच्या कडुन तीन ब्रास वाळु व ट्रक असा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. मागील काही दिवसापासून चोरुन वाळु नेली जात असल्याबाबत माहीती पोलिसांना मिळाली त्यानंतर ही कारवाई केली .याबाबत अधिक माहिती अशी की, सहा ऑगस्ट रोजी पहाटे चारच्या सुमारास कोंढार चिंचोली तालुका करमाळा गावचे हद्दीत टाकळी ते भिगवण जाणाऱ्या रोडवर कोंढार चिंचोली गावात जाणाऱ्या चौकात सतीश मंजुळे रा. केतुर क्रमांक २ ता. करमाळा याच्या सहा चाकी ट्रक मध्ये सुमारे तीन ब्रास वाळू ही मलठण जिल्हा पुणे येथून भीमा नदीच्या पात्रातून चोरून आणलीहोती.बेकायदेशीर ऱित्या विनापरवाना वाहतूक करत असताना त्याला करमाळा पोलिसांनी पकडले. सदरची कारवाई पोलिस हवालदार मारुती रणदिवे, पोलीस कॉन्स्टेबल अमोल जगताप व सिद्धेश्वर लोंढे यांनी केली आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटचे संस्थापक प्रा.डॉ महेश निकत यांची मेस्टा सोलापूर जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

  करमाळा प्रतिनिधी : महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशन (MESTA) यांच्या वतीने शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय…

1 day ago

करमाळा भाजपा शहर उपाध्यक्षपदी कपिल मंडलिक यांची निवड

  करमाळा प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टी करमाळा शहराच्या उपाध्यक्षपदी युवा कार्यकर्ते तथा भाजपाचे निष्ठावान…

2 days ago

छत्रपती शिवाजी महाराज यांचा आश्वारूढ पुतळयाचे भूमिपूजन पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या शुभहस्ते होणार – मोहिनी संजय सावंत, नगराध्यक्षा करमाळा नगर परिषद

करमाळा प्रतिनिधी : करमाळा शहर व तालुक्यातील सर्व शिवप्रेमींची गेल्या अनेक वर्षांपासूनची बहुप्रतिक्षित इच्छा आता…

3 days ago

जेऊरमध्ये महावितरणविरोधात बळीराजाचा एल्गार; करमाळा तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांच्या नेतृत्वाखाली विराट धरणे आंदोलन

​जेऊर (प्रतिनिधी): करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा विस्कळीत वीजपुरवठा आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज विजेच्या लपंडावाविरोधात आज…

3 days ago