चिखलठाण येथे आमदार संजयमामा शिंदे यांचे वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर व सन्मान सोहळा कार्यक्रम संपन्न

करमाळा प्रतिनिधी
करमाळा तालुक्याचे विकास प्रिय आमदार संजय मामा शिंदे यांच्या 54 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या रक्त दान शिबिराचे उद्घाटन माढा तालुका आमदार बबन दादा शिंदे व त्यांच्या पत्नी सौ. सुनंदा शिंदे वहिनी साहेब व करमाळा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष व शिवसेना सोलापूर जिल्हा उपजिल्हा प्रमुख महेश चिवटे यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला .चिखलठाण गावचे सलग 35 वर्ष सरपंच पद भूषविलेले कै. वस्ताद सुखदेव गलांडे यांच्या पुतळयाला आमदार बबनदादा शिंदे यांच्या शुभ हस्ते पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला कार्यक्रमा चे अध्यक्षस्थान करमाळा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष व शिवसेना सोलापूर जिल्हा उपप्रमुख महेश चिवटे साहेब यांनी भूषविले. कार्यक्रमा चे प्रास्ताविक सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र बारकुंड साहेब यांनी केले
या वेळी इंटरनॅशनल टॅलेंट परिक्षेत राज्यात प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल रणजित नवनाथ मारकड चिखलठाण यांचा सन्मान माढा तालुका आमदार बबन दादा शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला, एकरी 100 टन ऊस उत्पादन केल्याबद्दल प्रगतशील बागायतदार चंद्रकांत सुरवसे, ऊस वहातूकदार साहेबराव मारकड, कोरोना काळात चांगले काम केल्या बद्दल डाॅ. बारकुंड यांचा सन्मान दादासाहेब यांच्या शुभ हस्ते करण्यात आला
या वेळी चिखलठाण विकास सेवा सोसायटी चे चेअरमन विकास गलांडे, कुगाव सरपंच महादेव कामटे, माजी जिल्हा परिषद सदस्य संदिपान तात्या बारकुंड, दैनिक लोकमत पत्रकार नासीर कबीर, चिखलठाण माजी उपसरपंच दिनकर नाना सरडे, महेश कानगुडे, समाधान गव्हाणे, बाबू गोळे, सोमनाथ राऊत, अतुल जानभरे, चिखलठाण ग्रामस्थ, युवा वर्ग उपस्थित होते
रक्तदान शिबिराचे आयोजन जानता राजा गणेश मंडळ चिखलठाण, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सोलापूर जिल्हा परिषद राजेंद्र बारकुंड साहेब व डाॅ. भूषण बारकुंड मित्र मंडळ चिखलठाण व समस्त ग्रामस्थ चिखलठाण यांनी केले .

saptahikpawanputra

Recent Posts

ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटचे संस्थापक प्रा.डॉ महेश निकत यांची मेस्टा सोलापूर जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

  करमाळा प्रतिनिधी : महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशन (MESTA) यांच्या वतीने शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय…

1 day ago

करमाळा भाजपा शहर उपाध्यक्षपदी कपिल मंडलिक यांची निवड

  करमाळा प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टी करमाळा शहराच्या उपाध्यक्षपदी युवा कार्यकर्ते तथा भाजपाचे निष्ठावान…

2 days ago

छत्रपती शिवाजी महाराज यांचा आश्वारूढ पुतळयाचे भूमिपूजन पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या शुभहस्ते होणार – मोहिनी संजय सावंत, नगराध्यक्षा करमाळा नगर परिषद

करमाळा प्रतिनिधी : करमाळा शहर व तालुक्यातील सर्व शिवप्रेमींची गेल्या अनेक वर्षांपासूनची बहुप्रतिक्षित इच्छा आता…

3 days ago

जेऊरमध्ये महावितरणविरोधात बळीराजाचा एल्गार; करमाळा तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांच्या नेतृत्वाखाली विराट धरणे आंदोलन

​जेऊर (प्रतिनिधी): करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा विस्कळीत वीजपुरवठा आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज विजेच्या लपंडावाविरोधात आज…

3 days ago