करमाळा प्रतिनिधी प्रेरणा मानव विकास प्रतिष्ठानच्या वतीने भारत देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण होत असल्याने देशभक्ती भावना कायमस्वरूपी सर्वांच्या मनात राहावी म्हणून 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट या कालावधीत केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे ” *हर घर तिरंगा”* हा उपक्रम राबविला जाणार आहे हा उपक्रम प्रेरणा मानव विकास प्रतिष्ठानच्या वतीने रावगाव ता. करमाळा येथे राबविण्यात येणार आहे . यावर्षी भारतीय स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष साजरे होत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आव्हानानुसार “हर घर तिरंगा” हा उपक्रम देशभर राबविण्यात येणार आहे . ध्वज संहितेमध्ये काहीसे बदल करून नियमांतील शिथीलता आणून नागरिकांना उपक्रमात सहभागी करण्यासाठी विशेष प्रयत्न केले गेले आहेत नाममात्र दरात तिरंगा ध्वज उपलब्ध व्हावा यासाठी शासनाच्या पोस्ट कार्यालयाच्या माध्यमातूनही याची व्यवस्था करण्यात आली आहे यापूर्वी ध्वजसंहिती चे नियम अत्यंत कडक होते त्याची अंमलबजावणी देखील काटेकोरपणे पाळली जात होती त्यामुळे नागरिकांच्या मनामध्ये राष्ट्रध्वजाबाबत एक प्रकारची भीती होती देशाबद्दल अभिमान असलेल्या व्यक्तींना देखील आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी तिरंगा राष्ट्रध्वज फडकवण्यापासून वंचित राहावे लागत होते काही गडबडीने एखादी चूक झाल्यास त्याचा नाहक त्रास भोगावा लागेल ही भीती दूर करण्यासाठी व चांगले वातावरण निर्माण करण्यासाठी शासनाकडून ध्वजसंहितेच्या नियमात काहीसे बदल करण्यात आलेले आहेत यामुळे आता देशभक्तीमय चांगल्या वातावरणाची सुरुवात होत आहे . यावेळी प्रेरणा मानव विकास प्रतिष्ठानच्या वतीने 500 राष्ट्र ध्वजाचे मोफत वाटप करण्यात येणार आहे . संस्थेचे अध्यक्ष रामदास कांबळे सांगितले आहे.
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील उद्योजक क्लासिक कंपनीचे मालक अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचे करमाळा…
करमाळा प्रतिनिधी निमगाव (ह) येथे बुधराणी हॉस्पिटल पुणे व आधार बहु. उद्दे. संस्था, व कर्मवीर…
करमाळा प्रतिनिधी छोटे छोटे भूखंड उपलब्ध व्हावे या मागणीसाठी आपण विशेष प्रयत्न केले असून उद्योग…