आ.संजयमामा शिंदे यांच्या वाढदिवसानिम्मित पांडे येथे हिमोग्लोबिन तपासणी महिला मेळावा संप्पन

पांडे  प्रतिनिधी पांडे येथे राष्ट्रवादी युवती काँग्रेस जिल्हा कार्यकारणी आढावा बैठक, राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी या कार्यक्रमामध्ये राष्ट्रवादी युवती सोलापूर जिल्हाध्यक्षा श्रीया भोसले यांनीसुध्दा उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाची सुरुवात आमदार संजयमामा शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी युवती करमाळा आयोजित, हिमोग्लोबिन तपासणी शिबिराला भेट देऊन झाली. पक्ष, संघटना वाढ, पक्षाची ध्येयधोरणे तळागाळा पर्यंत पोहोचवण्यासाठी विविध विषयांवर या वेळी सलगर यांनी मार्गदर्शन केले. तसेच उपस्थित महिलांचे प्रश्न ऐकून त्यावर उपाययोजना करण्या संदर्भात ही चर्चा झाली. या आढावा बैठकीचे आयोजन राष्ट्रवादी युवती काँग्रेस करमाळा यांच्या वतीने करण्यात आले होते. या बैठकीत करमाळा युवती तालुकाध्यक्षा शीतल क्षीरसागर यांनी युवती काँग्रेस मार्फत संपुर्ण तालुक्यात सुरु असलेल्या “क्रांती एक पाऊल छेडछाड मुक्तीकडे व सायबर अलर्ट” या कार्यक्रमाची माहिती दिली. तसेच संघटनावाढी साठी नवीन सदस्य नोंदनी सुरू करण्यात येणार आहे अशी उपस्थितांना माहिती दिली.या कार्यक्रमाला सोलापूर जिल्हाकार्यकारणी सदस्य शीतल क्षीरसागर, स्नेहल अवचर, ऋतुजा सुर्वे, सारिका गायकवाड, तेजस्वीनी घाडगे, दिलखूष तांबोळी, नम्रता पाटील, हर्षाली परचड राव, श्वेता देशपांडे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते. तसेच राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष आशपाक जमादार, महिला जिल्हाउपाध्यक्षा नंदिनी लुंगारे, गावातील ग्रामस्थ ज्ञानदेव क्षीरसागर, गहिनीनाथ वीर, प्रदीप क्षीरसागर, साहिल मुजावर, समीर सय्यद, अजय भोसले व गावातील बहूसंख्य युवती व महिला भगिनी उपस्थित होत्या.

saptahikpawanputra

Recent Posts

यशवंत शिंदे यांची नेमबाजी स्पर्धेत सुवर्णपदकाला गवसणी! ४१ व्या महाराष्ट्र राज्य नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदकमाढा तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा

करमाळा प्रतिनिधी  निमगाव (टें.) येथील आदर्श सरपंच तथा विठ्ठल कॉर्पोरेशनचे कार्यकारी संचालक श्री. यशवंत संजयमामा…

24 hours ago

प्राचार्य बाळासाहेब नरारे यांना पुरी (ओडिशा) येथे ‘सुकुमारी स्वरमनी’ पुरस्काराने सन्मानित

करमाळा प्रतिनिधी करमाळा  येथील कमलाभवानी बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष तथा सुरताल संगीत विद्यालयाचे प्राचार्य श्री. बाळासाहेब…

1 day ago

करमाळा शहरातील दगडी रोड येथील रहिवासी शारदा पिसे दुःखद निधन

करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील दगडी रोड येथील रहिवासी शारदा सुरेश पिसे (वय ७१) यांचे अल्पशा…

2 days ago

लोकशाही बचाव अराजकता हटाव सोलापूरच्या भाजप मोर्चाच्या नियोजनासाठी भाजप जिल्हा युवा नेते दिग्विजय बागल यांच्या उपस्थितीत करमाळ्यात १ नोव्हेंबरला बैठक- सचिन पिसाळ

करमाळा प्रतिनिधी काँग्रेस इंडी आघाडी आणि डाव्या पक्षांकडून भारतीय जनता पक्षाविरोधात खोटा प्रचार करून पक्षाची…

7 days ago

दुष्काळ व पाणीटंचाई संदर्भातील बैठक आमदार.नारायण (आबा)पाटील यांनी जेऊर येथे न घेता करमाळा येथे पंचायत समिती सभागृहात घ्यावी- ॲड. अजिनाथ विघ्ने उपसभापती पं.स.करमाळा

करमाळा प्रतिनिधी  करमाळा तालुक्याची दुष्काळ निवारण व पाणीटंचाई आढावा बैठक आमदार. नारायण( आबा) पाटील यांचे…

1 week ago

डॉ अजिंक्य पवार यांची एम.डी. परीक्षेत यशस्वी भरारी; जनरल मेडिसिनमध्ये पदव्युत्तर पदवी संपादन डॉ. रविकिरण पवार कुटुंबीयांचा अभिमान उंचावला सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव

करमाळा : प्रतिनिधी मेहनत, जिद्द, सातत्यपूर्ण अभ्यास आणि ध्येयाप्रती असलेल्या निष्ठेच्या जोरावर डॉ. अजिंक्य रविकिरण…

1 week ago