करमाळा प्रतिनिधी महाराष्ट्र शासन कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) करमाळायांच्यावतीने करमाळा फळ शेत शिवारातील नैसर्गिकरीत्या उगवल्या जाणाऱ्या रानभाज्या/रानफळे यांचे महत्व व आरोग्य विषयक माहिती सर्वसामान्य नागरीकांना होणे आवश्यक आहे. सदर रानभाज्या नैसर्गिकरीत्या येत असल्यामुळे त्यावर रासायनिक किटकनाशके फवारणी करण्यात येत नाही. शहरी लोकांमध्ये याबाबत जागृती करणे आवश्यक आहे. यासाठी संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये प्रत्येक जिल्हा व तालुक्याच्या ठिकाणी दि. ९ ते १५ ऑगस्ट २०२२ या कालावधीमध्ये रानभाजी महोत्सव साजरा करण्यात येत आहे.त्यानुसार आपल्या करमाळा तालुक्यामध्ये *गुरुवार दिनांक ११/०८/२०२२ रोजी पंचायत समिती सभागृह करमाळा येथे सकाळी ठिक १०:०० वाजता रानभाजी महोत्सव* साजरा करण्यासाठीचे नियोजन करण्यात आलेले आहे. तरी सदर रानभाजी महोत्सवामध्ये जे शेतकरी रानभाज्या विक्री करण्यास इच्छुक आहेत त्यांची माहिती दि. १०/०८/२०२२ रोजी पर्यंत तालुका कृषि अधिकारी कार्यालयास कळवावे. रानभाजी महोत्सवा मध्ये भाग घेणाऱ्या लाभार्थींना कृषि विभागाच्या वतीने प्रमाणपत्र दिले जाणार आहेत. तरी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सदर रानभाजी महोत्सवामध्ये सहभाग घ्यावा असे कृषि विभागाच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे.
आपल्या भागात येणाऱ्या काही रानभाज्याची नावे, कडवंची , तांदुळजा, चिघळ , माठ, कुंजीर, हादगा ,अळू, पाथरी,. उंबर,फळे, शेवग्याची पाने, सराटा, कुरडू, आघाडा,. केना,. खापरखुटी, गुळवेल,. कपाळफोडी, भुई आवळा,. पिंपळाची पाने,. टाकळा / कास्वद इत्यादी.
करमाळा प्रतिनिधी भागवत कथाही कल्पवृक्षासारखी असून कलियुगात देवाला प्रत्यक्ष पाहण्याची ताकद मानव जीवनाचे सार्थक करण्याची…
करमाळा प्रतिनिधी पाठवा :- दिवंगत भाजपा नेते, भारताचे माजी पंतप्रधान तथा भारतरत्न स्व. अटलबिहारी वाजपेयी…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यात गेली काही दिवसांपासून उजनी जलाशय व सीना नदीतून अवैधरित्या उपसा सुरू…
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील ज्ञानसेवा सोशल फाउंडेशन संचलित ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा यांच्या ४ थ्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…