ज्या आमदारावर गुन्हेगारीचे आरोप केले त्यांना मंत्रीमंडळात स्थान दिले सरकारची भुमिका दुट्टपी-प्रतापराव जगताप

करमाळा प्रतिनिधी ज्या आमदारावर गुन्हेगारीचे  आरोप केले गेले होते त्याच आमदारांना कल्हई करुन नव्याने मंत्रीमंडळात स्थान दिले गेली असल्याची टिका काँग्रेस आय पक्षाचे तालुकाध्यक्ष प्रतापराव जगताप यांनी केली. ते मौजे वाशिंबे ता.करमाळा येथिल शाखा उद्घाटन प्रसंगी बोलत होते.यावेळी ओ.बी.सी.विभागाचे सोलापुर जिल्हाध्यक्ष राजेंद्र रुपनवर पाटील, गिरीश शेटे महासचिव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी तालुका उपाध्यक्ष इकबाल शेख, सरचिटणीस दीपक ननवरे ,दादा पाटील, अमोल पाटील उपस्थित होते.यावेळी अधिक बोलताना श्री जगताप भा.ज.पा.च्या बदलत्या भुमिके विषयी म्हणाले की महाराष्ट्र सरकारचा बहुचर्चित मंत्रीमंडळ कालच पार पडला परंतु हा मंत्रीमंडळ विस्तार करायला तब्बल १ महीन्याहुन अधिक कालावधी उलटला.भा.ज.पा. ने विरोधी पक्षात असताना ज्यांच्यावर ठासुन आरोप केले त्यांच्यांच मांडीला मांडी लावुन आज सरकार स्थापन केले.हि भा.ज.पा.ची दुटप्पी भुमिका संपुर्ण महाराष्ट्र उघड्या डोळ्यानी बघत आहे.आज बिहार मध्ये काय झाले हे आपणाला सर्वश्रुत आहे.केलेल्या कर्माची फळ ही येणाऱ्या काळात नक्कीच भा.ज.पा. ला मिळणार आहेत.महाराष्ट्रात अती पावसाने हैरान केले तरी ठोस निर्णय घेण्यासाठी आणखी पालकमंत्रीसुध्दा कोणत्याच जिल्ह्याला मिळालेले नाहीत.
ओ.बी.सी.विभागाचे तालुकाध्यक्ष गफुरभाई शेख व अमोल भोंग यांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढवुन शाखेचे उद्घाटन संपन्न झाले.तद्नंतर विठ्ठल रुक्मिणी मंदिरात छोटेखानी बैठकीचे आयोजन करण्यात आले.यावेळी शाखाध्यक्ष संदीप दादा झोळ,सोमनाथ झोळ,यांनी आपले विचार व्यक्त केले.यावेळी शाखेचे कार्याध्यक्ष आनंद भैय्या झोल, उपाध्यक्ष हणुमंत पवार,सचिव अतुल रणदिवे,सहसचिव असिफ शेख,खजिनदार अमोल भोंग,सहखजिनदार निखिल शिंदे,प्रसिध्दीप्रमुख पै.वाहिद शेख,प्रकाश ढवळे संभाजी पवार, युवराज झोळ, निखिल गायकवाड, धनाजी लोखंडे, निलेश कुलकर्णी, धनाजी डोंबाळे धनाजी झोळ गोपीनाथ झोळ आदी सर्व पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गफुर भाई शेख मित्रपरिवाराने तसेच शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.

saptahikpawanputra

Recent Posts

लोकशाही बचाव अराजकता हटाव सोलापूरच्या भाजप मोर्चाच्या नियोजनासाठी भाजप जिल्हा युवा नेते दिग्विजय बागल यांच्या उपस्थितीत करमाळ्यात १ नोव्हेंबरला बैठक- सचिन पिसाळ

करमाळा प्रतिनिधी काँग्रेस इंडी आघाडी आणि डाव्या पक्षांकडून भारतीय जनता पक्षाविरोधात खोटा प्रचार करून पक्षाची…

3 days ago

दुष्काळ व पाणीटंचाई संदर्भातील बैठक आमदार.नारायण (आबा)पाटील यांनी जेऊर येथे न घेता करमाळा येथे पंचायत समिती सभागृहात घ्यावी- ॲड. अजिनाथ विघ्ने उपसभापती पं.स.करमाळा

करमाळा प्रतिनिधी  करमाळा तालुक्याची दुष्काळ निवारण व पाणीटंचाई आढावा बैठक आमदार. नारायण( आबा) पाटील यांचे…

6 days ago

डॉ अजिंक्य पवार यांची एम.डी. परीक्षेत यशस्वी भरारी; जनरल मेडिसिनमध्ये पदव्युत्तर पदवी संपादन डॉ. रविकिरण पवार कुटुंबीयांचा अभिमान उंचावला सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव

करमाळा : प्रतिनिधी मेहनत, जिद्द, सातत्यपूर्ण अभ्यास आणि ध्येयाप्रती असलेल्या निष्ठेच्या जोरावर डॉ. अजिंक्य रविकिरण…

6 days ago

प्रा. डॉ. महेश निकत यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान; करमाळ्याच्या शैक्षणिक क्षेत्राचा गौरव

  करमाळा, प्रतिनिधी : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा यांचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. महेश मच्छिंद्र…

6 days ago

अखिल भारतीय क्षत्रिय महासभा या संघटनेच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी करमाळा येथील नरेंद्रसिंह ठाकुर यांची निवड

  करमाळा प्रतिनिधी अखिल भारतीय क्षत्रिय महासभा या संघटनेच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी करमाळा येथील नरेंद्रसिंह ठाकुर यांची…

7 days ago