गणेश चिवटे यांच्या श्रीराम प्रतिष्ठानच्या विद्यार्थ्यांना मोफत भात – भाजी वाटपाचा उपक्रम कौतुकास्पद पोलिस अधिकाऱ्याचे गौरवद्गागार

 

करमाळा प्रतिनिधी  श्रीराम प्रतिष्ठान करमाळा यांच्या वतीने गेली दहा ते अकरा वर्षापासून अखंडितपणे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोफत भात – भाजी वाटप करण्यात येते.परंतु गेल्या दोन वर्षापासून कोरोना महामारीमुळे शाळा व हायस्कूल बंद असल्यामुळे हा कार्यक्रम बंद होता, परंतु आता शाळा व कॉलेज सुरळीत चालू झाल्यानंतर श्रीराम प्रतिष्ठानच्या वतीने विद्यार्थ्यांना मोफत भाजी वाटपाची सुरवात करमाळा पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी API जगदाळे व API भुजबळ साहेब यांच्या हस्ते करण्यात आली ,
यावेळी जगदाळे साहेब यांनी विद्यार्थ्यांना त्यांचे अनुभव सांगितले तसेच श्रीराम प्रतिष्ठान व गणेश चिवटे यांचे कार्य हे आदर्शवत आहे, श्रीराम प्रतिष्ठानचे सामाजिक काम पाहिल्यावर समाधान वाटले असे मत त्यांनी व्यक्त केले,
तसेच भुजबळ साहेब यांनी विद्यार्थ्यांना परिस्थितीशी झुंज देत गरुड झेप घेऊन तुम्ही एक दिवस मोठे अधिकारी व्हा ,तुमच्या गावचे व तालुक्याचे नाव रोशन करा असे प्रोत्साहन देत मार्गदर्शन केले, यावेळी श्रीराम प्रतिष्ठानच्या मोफत भात- भाजी वाटप कार्यक्रमास जगदाळे व भुजबळ साहेब उपस्थित राहिल्याबद्दल श्रीराम प्रतिष्ठानचे अध्यक्ष गणेश चिवटे यांनी त्यांचे स्वागत करून आभार मानले, यावेळी भाजपाचे शहराध्यक्ष जगदीश अग्रवाल, महाराष्ट्र चॅम्पियन अफसर तात्या जाधव, अनिल अग्रवाल, रायगावचे चेअरमन दासा बापू बर्डे ,विशाल साळुंखे ,शरद कोकीळ, संजय किरवे व विद्यार्थी उपस्थित होते ,

saptahikpawanputra

Recent Posts

महात्मा गांधी विद्यालय करमाळा येथे वर्गमित्रांचे तब्बल 45 वर्षांनी  संमेलन एक सुखद झुळुक

माणसाने निवृत्त झाल्यावर एकत्रित येऊन जुन्या आठवणींना उजाळा आणि मैत्रीचे नूतनिकरण करण्याची आलेली सुवर्णसंधी दवडायची…

7 hours ago

भारताचे माजी पंतप्रधान भाजपचे ज्येष्ठ नेते स्व. अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त भाजपच्यावतीने अंगणवाडीतील चिमुकल्यांना शालेय साहित्याचे वाटप

करमाळा प्रतिनिधी जेष्ठ संसदपटू असलेले अटलबिहारी वाजपेयी राजकारणात चार दशक सक्रीय होते.असे मत भारतीय जनता…

1 day ago

भागवत कथाही कल्पवृक्षासारखी असून कलियुगात देवाला प्रत्यक्ष पाहण्याची ताकद मानव जीवनाचे सार्थक करण्याची गुरुकिल्ली -साध्वी प.पू अनुराधा दिदी शेटे पंढरपूरकर

करमाळा प्रतिनिधी भागवत कथाही कल्पवृक्षासारखी असून कलियुगात देवाला प्रत्यक्ष पाहण्याची ताकद मानव जीवनाचे सार्थक करण्याची…

2 days ago

भारतरत्न माजी पंतप्रधान स्व.अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त देवळाली येथे नेत्ररोग तपासणी संपन्न

करमाळा प्रतिनिधी पाठवा :- दिवंगत भाजपा नेते, भारताचे माजी पंतप्रधान तथा भारतरत्न स्व. अटलबिहारी वाजपेयी…

3 days ago

अवैध वाळु उपसा बंद करा आमदार नारायण पाटील जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना पञ

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यात गेली काही दिवसांपासून उजनी जलाशय व सीना नदीतून अवैधरित्या उपसा सुरू…

3 days ago

करमाळ्यात रविवारी २९ डिसेंबरला होणार भव्य ग्लोबल टॅलेंट सर्च परीक्षा २०२४-२५

करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील ज्ञानसेवा सोशल फाउंडेशन संचलित ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा यांच्या ४ थ्या…

4 days ago