करमाळा प्रतिनिधी उजनी धरण आता ९० टक्के भरले असून , एकूण जलसाठा १०७ टीएमसी झाला असून , धरण १०० % भरण्यासाठी आता केवळ १० टीएमसी पाण्याची गरज आहे.धरणातील उपयुक्त जलसाठा ही ४३ टीएमसी झाला आहे.दौंड येथून उजनी धरणात येणारा विसर्ग आता पूर्णपणे मंदावला असून, तो २७१७ क्युसेकपर्यंत खाली आला आहे. त्यामुळे आता धरणाच्या पाणी पातळीत होणारी वाढही थांबली आहे.असे असले तरी मागील पाच – सहा वर्षांच्या तुलनेत चालू पावसाळ्यात धरणात समाधानकारक पाणीसाठा झाला आहे.यंदाच्या वर्षी अपेक्षेपेक्षा लवकर उजनी धरण १०० टक्के भरणार असल्याने शेतकऱ्यामध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
करमाळा: प्रतिनिधी शेतकऱ्यांना रासायनिक खते पारदर्शक आणि सुलभ पद्धतीने उपलब्ध व्हावीत, तसेच खतांच्या विक्रीतील काळाबाजार,…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुका मंगल कार्यालय असोसिएशनची मासिक बैठक शनिवार, दि. १२ सप्टेंबर रोजी पोथरे…
करमाळा प्रतिनिधी: अमरावती येथे सुरू असलेल्या ३४ व्या ज्युनियर राज्य फेंसिंग अजिंक्यपद स्पर्धा २०२६ मध्ये…
करमाळा प्रतिनिधी: गेल्या दोन-तीन वर्षांपासून शेतकरी वर्ग सातत्याने अस्मानी आणि सुलतानी संकटांचा सामना करत आहे.…
करमाळा प्रतिनिधी बैलपोळा हा केवळ बैलांच्या पूजनाचा सण नसून, कृषीसंस्कृती, पशुप्रेम, कृतज्ञता आणि भारतीय परंपरेतील…
* करमाळा प्रतिनिधी : श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त करमाळा येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या…