करमाळा प्रतिनिधी
करमाळा येथील विद्या विकास मंडळाचे सचिव विलासरावजी घुमरे सर , संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड , महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल. बी. पाटील , उपप्राचार्य संभाजी किर्दाक यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार महाविद्यालयात पंचमी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल. बी. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना भारतीय संस्कृतीत असणारे पंचमीचे महत्त्व सांगितले . झोके , फुगड्या , झिम्मा अशा पारंपरिक खेळाचे महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने असणारे महत्त्व पटवून दिले . यावेळी महाविद्यालयाच्या कार्यालयीन अधीक्षक सौ. संगीता नाईक या उपस्थित होत्या. या पंचमी महोत्सवानिमित्त महाविद्यालयातील झाडांना झोके बांधण्यात आले होते. यावेळी विद्यार्थिनींनी विविध प्रकारच्या फुगड्या , झिम्मा , फेराची पारंपारिक गाणी पारंपरिक गाणी , पारंपरिक वेशभूषा , पारंपरिक खेळ इत्यादीचा उत्स्फूर्तपणे मनमुराद आनंद लुटला . त्यामुळे महाविद्यालयात सर्वत्र आनंदाचे उत्साहाचे चैतन्यमय वातावरण निर्माण झाले होते .
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे जिल्हा समन्वयक प्रा. लक्ष्मण राख , प्रा. सुजाता भोरे , प्रा. संध्या बिले , प्रा. सुरेखा जाधव , प्रा.मुक्ता काटवटे , प्रा. निता माने , सौ. अनिता देशमुख- साठे यांनी परिश्रम घेतले . या कार्यक्रमासाठी 377 विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या.
करमाळा प्रतिनिधी: अमरावती येथे सुरू असलेल्या ३४ व्या ज्युनियर राज्य फेंसिंग अजिंक्यपद स्पर्धा २०२६ मध्ये…
करमाळा प्रतिनिधी: गेल्या दोन-तीन वर्षांपासून शेतकरी वर्ग सातत्याने अस्मानी आणि सुलतानी संकटांचा सामना करत आहे.…
करमाळा प्रतिनिधी बैलपोळा हा केवळ बैलांच्या पूजनाचा सण नसून, कृषीसंस्कृती, पशुप्रेम, कृतज्ञता आणि भारतीय परंपरेतील…
* करमाळा प्रतिनिधी : श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त करमाळा येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या…
करमाळा प्रतिनिधी गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा, सामाजिक एकोपा आणि सांस्कृतिक परंपरेचा उत्सव म्हणून साजरा होत…
करमाळा प्रतिनिधी : संत ज्ञानेश्वर महाराजांच्या जन्माचे ७५० वे वर्ष राज्यभरात मोठ्या उत्साहात साजरे…