भारतीय संस्कृतीमध्ये सणांना फार महत्त्व आहे. एकत्र येऊन आनंदाने आणि उत्साहाने सण साजरे केल्याने नात्यांचे बंध आणखी दृढ होतात. असाच एक नात्यांचा बंध दृढ करणारा भारतीय सण म्हणजे राखी पोर्णिमा. भाऊ-बहिणीसाठी खास असलेल्या या सणाला रक्षाबंधन असेही म्हणतात. देशभरात या सणाला वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते. उत्तर भारतात हा सण कजरी पोर्णिमा या नावाने ओळखला जातो तर पश्चिम भारतात हा सण नारळी पोर्णिमा असेही म्हटले जाते. दरवर्षी श्रावणी पोर्णिमेलाच हा सण साजरा केला जातो आणि ही परंपरा गेल्या कित्येक वर्षांपासून आपल्याकडे आहे. रक्षाबंधन हा भाऊ-बहिणीच्या प्रेमाचा सर्वात मोठा उत्सव मानला जातो. रक्षाबंधन दिवशी बहिणी त्यांच्या भावाच्या मनगटावर राखी बांधतात त्यासोबत त्यांच्या भावाच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात आणि भाऊ आपल्या बहिणीला संरक्षण देण्याचे वचन देतो. यावेळी भाऊ-बहीण एकमेकांना मिठाई खाऊ घालतात आणि भेटवस्तू देतात. रक्षाबंधन हा सण सर्वात मोठ्या सणांपैकी एक आहे. रक्षाबंधन सणाबाबत वेगवेगळ्या पौराणिक कथा आहेत. रक्षाबंधनाची सुरुवात सतयुगापासून झाली, असा दावा करण्यात येतो. त्याबाबत सविस्तर जाणून घेऊ यसर्वप्रथम इंद्राणीने पती इंद्रला राखी बांधली .
प्राचीन काळात रक्षाबंधन हे केवळ भाऊ-बहिणीच्या प्रेमाचे प्रतीक म्हणून साजरे केले जात नव्हते. याबाबत इंद्र आणि इंद्राणीच्या दंतकथा सांगितली जाते. या पौराणिक कथेनुसार, देव आणि दानवांमध्ये युद्ध चालू होते, त्या युद्धात इंद्र देवाचा दानवांकडून पराभव झाला होता. त्यानंतर इंद्राची पत्नी इंद्राणीने भगवान विष्णूची प्रार्थना केली. भगवान विष्णूंनी इंद्राणीला एक पवित्र धागा दिला आणि तिला इंद्राच्या मनगटावर बांधण्यास सांगितले. इंद्राणीनेही रक्षासूत्र इंद्राच्या हातावर बांधले आणि त्यांचा आत्मविश्वास वाढला. त्यानंतर इंद्रदेवाने दानवांवर विजयी मिळविला अशी दंतकथा प्रसिद्ध आहे.दौपदी आणि कृष्णाच्या नातं महाभारतामध्ये जेव्हा श्री कृष्णाच्या हाताच्या बोटाला जखम होते आणि रक्त वाहते तेव्हा द्रोपदी आपल्या साडीची किनार फाडून कृष्णाच्या बोटाला बांधते. तेव्हापासून कृष्णाने द्रोपदीचे रक्षण करण्याचा संकल्प करतो अशीही एक दंतकथा सांगितली जाते. सिकंदरच्या बायकोने राजा पुरूला पाठवली होती राखी आणखी कथेनुसार, प्रचलित कथांनुसार, संपूर्ण जग जिंकणारा सिकंदर भारतात पुरूसला भेटला. त्यावेळी सिकंदरचा युद्धात पराभव झाला होता. असे म्हणतात की त्यावेळी सिकंदरच्या पत्नीने त्याचा जीव वाचवण्यासाठी राजा पुरूकडे राखी पाठवली होती. त्यानंतर पुरू सिकंदरवर हात उचलू शकला नाही आणि त्याला कैदी बनविण्यात आले, असे सांगितले जाते. पण, सिंकदरने पुरूला राज्य परत केले होते.
पौराणक कथा आणि इतिहासानुसार रक्षाबंधनाचा सण काळानुसार बदलत गेला. आता भाऊ-बहिणीतील अतूट प्रेम, आपुलकी आणि बंध यांचे प्रतीक म्हणून देशात रक्षाबंधन साजरा करतात. रक्षाबंधन
पंचांगानुसार, , राखी पौर्णिमेची तिथी 11 ऑगस्ट रोजी सकाळी 10:39 वाजता सुरू होईल आणि 12 ऑगस्ट रोजी सकाळी 7:05 वाजता समाप्त होईल. 11 ऑगस्ट रोजी भद्रकाल सकाळी 08:51 ते 08:51 पर्यंत आहे. सूर्यास्तानंतर कोणतेही शुभ कार्य केले जात नाही असे हिंदू धर्मामध्ये मानले जात आहे. त्यामुळे भद्रकाळात किंवा रात्री भावांना राखी बांधता येत नाही. तर 12 ऑगस्ट रोजी पौर्णिमा सकाळी 7 ते पहाटे 5 पर्यंत असेल. यावेळी भद्राही नाही आणि उदयतिथीही आहे. त्यामुळे काही लोक 12 ऑगस्टला राखी बांधणे शुभ मानतात. जर तुम्ही 12 ऑगस्टला राखी बांधण्याचा विचार करत असाल तर सकाळी 7 वाजून 5 मिनिटांपूर्वी ही राखी बांधू शकता.
करमाळा प्रतिनिधी भागवत कथाही कल्पवृक्षासारखी असून कलियुगात देवाला प्रत्यक्ष पाहण्याची ताकद मानव जीवनाचे सार्थक करण्याची…
करमाळा प्रतिनिधी पाठवा :- दिवंगत भाजपा नेते, भारताचे माजी पंतप्रधान तथा भारतरत्न स्व. अटलबिहारी वाजपेयी…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यात गेली काही दिवसांपासून उजनी जलाशय व सीना नदीतून अवैधरित्या उपसा सुरू…
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील ज्ञानसेवा सोशल फाउंडेशन संचलित ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा यांच्या ४ थ्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…