करमाळा (प्रतिनिधी)”आझादी का अमृत महोत्सव कार्यक्रमांतर्गत करमाळा पोलीस स्टेशन व करमाळा होमगार्ड पथकाच्यावतीने श्रीखंडोबाचेमाळ करमाळा येथे वृक्षारोपण व करमाळा शहरातून “घर घर तिरंगा” ची जनजागृती रॅली काढण्यात आली.सदरचा कार्यक्रम अप्पर पोलीस अधीक्षक तथा होमगार्डचे जिल्हा समादेशक हिंम्मतराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली करमाळा होमगार्ड पथकाचे तालुका समादेशक अधिकारी सचिन जव्हेरी यांच्या नेतृत्वाखालील आयोजित करण्यात आला होता. यावेळी करमाळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे, करमाळाव विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी वाय. यु.जाधव, तालुका कृषी अधिकारी संजय वाकडे, करमाळा बस स्थानकाच्या आगारप्रमुख अश्विनी किरगत, श्रीदेवीचामाळ येथील सरपंच महेश सोरटे, करमाळा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष महेश चिवटे, काय सांगता न्युज चॅनलचे अशोक मुरूमकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला तर यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्रीदेवीचामाळ येथील ग्रामपंचायत सदस्य सचिन शिंदे, अमोल चव्हाण, संतोष पवार, तंटामुक्त गाव अध्यक्ष सचिन चोरमले, पोलीस पाटील मनोज जामदार, तुषार जगताप, सचिन चव्हाण ,मंगेश दोंडे, मारूती सुरवसे,हनुमंत फलफले, चंकेश्वर चौधरी, दादा मोरे राजेंद्र पवार यांसह बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते. ….…चौकट…
करमाळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे, मनोज बिडवे (जि.सी.बी मालक), दादाश्री फाऊंडेशनचे काकासाहेब काकडे, श्रीदेवीचामाळ ग्रामपंचायत सरपंच महेश सोरटे, वृक्षमित्र तेजस सुरवसे यांनी वृक्षारोपण करीता विशेष सहकार्य केले……*चौकटयावेळी होमगार्ड तालुका समादेशक अधिकारी व पत्रकार सचिन जव्हेरी यांनी वृक्षारोपणाबद्दल माहिती सांगितली. त्यानंतर काकडे, चिवटे, सोरटे व पोलिस निरीक्षक कोकणे यांनी मनोगत व्यक्त केले. सरपंच सोरटे यांनी उन्हाळ्यात येथे वृक्ष जळू नयेत म्हणून ठिबक केले जाणार असल्याचे सांगितले. तर चिवटे यांनी येथे ऑक्सिजन पार्क व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली. कोकणे यांनी वृक्षारोपणाची माहिती सांगत करमाळा शहर नैसर्गिक दृष्ट्या कसे चांगले आहे, याची माहिती सांगितलयानंतर करमाळा शहरातील प्रमुख मार्गावरून “आझादी का अमृत महोत्सव…..घरघर तिरंगा ची जनजागृती रॅली सर्व पुरूष व महीलां होमगार्ड च्या उस्थितीत हातात तिरंगा घेवून काढण्यात आली .यावेळी तालुका समादेशक अधिकारी सचिन जव्हेरी, महेश शहाणे पना.दिपक जव्हेरी,तुकाराम सोरटे, पंकज अंदुरे, संतोष कुकडे,दादा शिंदे, सद्दाम तांबोळी, पंकज पलंगे, जावेद काझी,प्रविण महिंद्रकर, संतोष कुलकर्णी,अतुल महाडिक, नारायण वायकुळे, अमोल गणगे, विशाल नलवडे, मुन्ना पठाण, सचिन ननवरे, सोमनाथ ढेपे, गणेश शहाणे,सागर माळवे, दिपक घाडगे, वायकुळे, हानपुडे, संभाजी कोळेकर, अभिजीत नवले, लाळगे, खराडे, नवनाथ मोरे महिला होमगार्ड सारिका बिडकर, किशोरी चुंबळकर, प्रभा दिक्षीत, पुनम टकले, शैला बुटे आदि उपस्थित होते. अल्पोपाहाराने कार्यक्रमाची सांगता झाली.
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील ज्ञानसेवा सोशल फाउंडेशन संचलित ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा यांच्या ४ थ्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील उद्योजक क्लासिक कंपनीचे मालक अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचे करमाळा…
करमाळा प्रतिनिधी निमगाव (ह) येथे बुधराणी हॉस्पिटल पुणे व आधार बहु. उद्दे. संस्था, व कर्मवीर…