काॅंग्रेस सरकारसारखे मोदी सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी- हरीभाऊ मंगवडे जिल्हा संघटक काॅंग्रेस ॲाय

करमाळा. प्रतिनीधी मोदी सरकारने भारतातील सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊन शेतकऱ्यांना न्याय देण्याचे काम करावे अशी मागणी सोलापूर जिल्हा काँग्रेस आयचे संघटक हरीभाऊ मंगवडे यांनी केली आहे.  देशामध्यै काँग्रेस पक्षाचे सरकार होते, त्यावेळेस पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी देशातील शेतकऱ्यांना 72 हजार कोटी रुपयाची कर्जमाफी दिली होती.. त्यावेळेस केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार या दोघांनी मिळून शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला होता, आता भारतीय जनता पार्टीचे सरकार आहे, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आहेत, त्यांनी आतापर्यंत शेतकऱ्याला एक रुपयाची ही कर्जमाफी दिली नाही. म्हणून मोदी सरकारने भारतातील सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊन शेतकऱ्यांना न्याय देण्याचे काम करावे असे आवाहन हरिभाऊ मंगवडे यांनी केले आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

करमाळा भाजपा शहर उपाध्यक्षपदी कपिल मंडलिक यांची निवड

  करमाळा प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टी करमाळा शहराच्या उपाध्यक्षपदी युवा कार्यकर्ते तथा भाजपाचे निष्ठावान…

18 hours ago

छत्रपती शिवाजी महाराज यांचा आश्वारूढ पुतळयाचे भूमिपूजन पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या शुभहस्ते होणार – मोहिनी संजय सावंत, नगराध्यक्षा करमाळा नगर परिषद

करमाळा प्रतिनिधी : करमाळा शहर व तालुक्यातील सर्व शिवप्रेमींची गेल्या अनेक वर्षांपासूनची बहुप्रतिक्षित इच्छा आता…

2 days ago

जेऊरमध्ये महावितरणविरोधात बळीराजाचा एल्गार; करमाळा तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांच्या नेतृत्वाखाली विराट धरणे आंदोलन

​जेऊर (प्रतिनिधी): करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा विस्कळीत वीजपुरवठा आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज विजेच्या लपंडावाविरोधात आज…

2 days ago