महाराष्ट्र शासन कृषि विभाग तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा करमाळा यांच्यावतीने रानभाज्या महोत्सव संपन्न

मनोज बोबडे प्रतिनिधी महाराष्ट्र शासन कृषि विभाग तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा करमाळा यांच्यावतीने रानभाज्या महोत्सव ११ ॲागस्ट रोजी संप्पन झाला. शेतशिवारातील नैसर्गिकरीत्या उगवल्या जाणाऱ्या रानभाज्या / रानफळे यांचे महत्व व आरोग्य विषयक माहिती सर्वसामान्य नागरीकांना होऊन शेतकऱ्यांना सदर रानभाज्या विक्रीतून काही प्रमाणात आर्थिक फायदा मिळावा या हेतूने जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने *रानभाजी महोत्सव* कार्यक्रमाचे आयोजन पंचायत समिती सभागृह करमाळा येथे करण्यात आले होते. सदर रानभाजी महोत्सवाचे उद्घाटन मा. तहसिलदार करमाळा श्री. समीर माने, गटविकास अधिकारी श्री. मनोज राऊत, निवासी नायब तहसीलदार श्री. सुभाष बदे व तालुका कृषी अधिकारी करमाळा श्री. संजय वाकडे साहेब यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी तालुक्यातील शेतकरी तसेच महिला बचत गटातील महिलांनी आपल्या शेतामध्ये पिकवलेल्या रानभाज्या विक्रीस आणल्या होत्या. मानवी आहारात प्रामुख्याने वनस्पतींचा समावेश असतो. धान्य, कडधान्य यांच्यानंतर मानवी आहारातील प्रमुख घटक म्हणजे भाजी. आपल्या आहारात भाजी म्हणून खोड, पाने, फळे, बिया, कंद, मुळे, फुले यांचा वापर केला जातो. भारतात भाजीच्या सुमारे ५५ प्रजाती आहेत. अलीकडील काळात बाजारपेठेत भाज्यांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यामुळे भाजी उत्पादनात वाढ करण्यासाठी आज अमर्यादित प्रमाणात रासायनिक खतांचा, रासायनिक द्रव्यांचा वापर शेतकरी करीत आहेत. यामुळे भाजी उत्पादनात, भाज्यांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. पण त्यांची नैसर्गिक चव, प्रतिकारशक्ती कमी होत चालली आहे.
असं म्हणतात आपल्या मातीत जे जे पिकतं ते आपण खावे.
या भाज्यांचे पावसाळ्यात येण्याचे प्रमाण जरी अधिक असले तरी वर्षभर ऋतुमानानुसार या भाज्या येत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आहाराचा मुख्य प्रश्न सुटतो; शिवाय कुपोषणावर देखील या रानभाज्या फायदेशीर आहेत. वनस्पती विज्ञानाचा अभ्यास असे दाखवतो की पावसाळ्याच्या सुरुवातीस असलेला अन्नधान्याचा तुटवडा भरून काढण्यासाठी, पौष्टीक अन्न मिळावे म्हणून निर्सगाने मुद्दामहून निर्माण केलेल्या भाज्यांचा वापर शेतकरी करीत असतात. इतर भाज्यांप्रमाणे लागवड शक्य नसल्याने पावसाळ्याच्या मोसमातच या भाज्या उपलब्ध होतात. याचबरोबर रानभाज्यांची ओळख व त्यांचे आहारातील महत्त्व समजण्यासाठी रानभाज्यांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. रानभाज्या मध्ये बांबू कोंब , चिघळ, सराटा, हादगा, पिंपळ, उंबर, कडवंची, भुई आवळा, पाथरी, तांदूळसा कुरडू, माट , हादगा इ. हयामध्ये जवळपास २७ रानभाज्या प्रदर्शनामध्ये प्रदर्शित करण्यात आल्या होत्या. या कार्यक्रमास श्री देवराव चव्हाण कृषी अधिकारी, श्री. योगेश जगताप ( उमेद ), श्री अजय बागल (आत्मा ) श्री. पोळके साहेब, श्री. राऊत साहेब, श्री. उमाकांत जाधव साहेब, श्री. गायकवाड साहेब, श्री. सत्यम झिंजाडे’ श्री. मनोज बोबडे (PMFME) , मंगेश भांडवलकर , श्री राहूल गोरवे, श्री. दिपक काकडे उपस्थित होते. करमाळा शहर व परीसरातील नागरीकांनी शेतकऱ्यांनी व महिला बचत गटातील महिलांनी विक्रीस आणलेल्या रानभाज्यांची खरेदी करून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

saptahikpawanputra

Recent Posts

महात्मा गांधी विद्यालय करमाळा येथे वर्गमित्रांचे तब्बल 45 वर्षांनी  संमेलन एक सुखद झुळुक

माणसाने निवृत्त झाल्यावर एकत्रित येऊन जुन्या आठवणींना उजाळा आणि मैत्रीचे नूतनिकरण करण्याची आलेली सुवर्णसंधी दवडायची…

22 hours ago

भारताचे माजी पंतप्रधान भाजपचे ज्येष्ठ नेते स्व. अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त भाजपच्यावतीने अंगणवाडीतील चिमुकल्यांना शालेय साहित्याचे वाटप

करमाळा प्रतिनिधी जेष्ठ संसदपटू असलेले अटलबिहारी वाजपेयी राजकारणात चार दशक सक्रीय होते.असे मत भारतीय जनता…

2 days ago

भागवत कथाही कल्पवृक्षासारखी असून कलियुगात देवाला प्रत्यक्ष पाहण्याची ताकद मानव जीवनाचे सार्थक करण्याची गुरुकिल्ली -साध्वी प.पू अनुराधा दिदी शेटे पंढरपूरकर

करमाळा प्रतिनिधी भागवत कथाही कल्पवृक्षासारखी असून कलियुगात देवाला प्रत्यक्ष पाहण्याची ताकद मानव जीवनाचे सार्थक करण्याची…

3 days ago

भारतरत्न माजी पंतप्रधान स्व.अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त देवळाली येथे नेत्ररोग तपासणी संपन्न

करमाळा प्रतिनिधी पाठवा :- दिवंगत भाजपा नेते, भारताचे माजी पंतप्रधान तथा भारतरत्न स्व. अटलबिहारी वाजपेयी…

4 days ago

अवैध वाळु उपसा बंद करा आमदार नारायण पाटील जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना पञ

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यात गेली काही दिवसांपासून उजनी जलाशय व सीना नदीतून अवैधरित्या उपसा सुरू…

4 days ago

करमाळ्यात रविवारी २९ डिसेंबरला होणार भव्य ग्लोबल टॅलेंट सर्च परीक्षा २०२४-२५

करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील ज्ञानसेवा सोशल फाउंडेशन संचलित ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा यांच्या ४ थ्या…

5 days ago