सोलापुर जिल्हयाचे वरदायिनी उजनी धरण शंभरी पार शेतकऱ्यांच्या आनंदाला उधाण

करमाळा प्रतिनिधी सोलापुर पुणे पश्चिम महाराष्ट्रासाठी वरदायनी ठरलेले  उजनी धरण शुक्रवार दि १२.ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी ८ घ्या  सुमारास १०० टक्के भरले, सध्या धरणात ११७ टीएमसी पाणी साठा झाला आहे.           यंदाच्या पावसाळ्यातील वैशिष्ट्य म्हणजे उजनी धरणात मागील दिड महिन्यांपासून अनेक वेळा दौंड मधून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात आला होता, परंतु पुण्यासह मावळमध्ये होत असलेल्या सततच्या पावसामुळे व दौंड येथून होत असलेल्या पाण्याच्या विसर्गावरच उजनी धरणाने आज १०० टक्क्याची पातळी गाठली आहे. 
२०१९ या वर्षी उजनी २७ ऑगस्टला १०० टक्के भरले होते. तर २०२० वर्षी उजनी ६ ऑगस्ट रोजी १०० टक्के झाले होते.तर ५ ऑक्टोंबर २०२१ रोजी उजनी शंभर टक्के भरले होते. मात्र या वर्षी गेल्यावर्षी पेक्षा जवळपास दोन महिने अगोदर उजनी धरण १०० टक्के भरले आहे. उजनीची निर्मिती झाल्यापासून म्हणजे गेल्या ४३ वर्षात ३३ वेळा १०० टक्के उजनी धरण भरले गेले आहे.
उजनी धरणावरील, भीमा नदीला येऊन मिळणाऱ्या मुळा, मुठा, पवना, इंद्रायणी या लहान-मोठ्या नद्यावर असलेल्या १९ धरणांपैकी अनेक धरणे १०० टक्के भरून ‘ओव्हरफ्लो’ झालेली आहेत.जुलै महिन्या पासून पुणे जिल्हा, मावळ भाग व भीमाशंकरचे डोंगर या परिसरात पावसाने दमदार हजेरी लावल्याने सर्व नद्यांन मध्ये पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात वाढली होती.हे वाढ झालेले पाणी दौंड येथून भीमा नदीत येत असल्यामुळे उजनी धरणातील पाण्याची पातळी सतत वाढत राहिल्यामुळे आज अखेरीस उजनी धरण १०० टक्के भरू शकले आहे.पावसाळ्यात धरणात समाधानकारक पाणीसाठा झाला आहे.यंदाच्या वर्षी अपेक्षेपेक्षा लवकर उजनी धरण १०० टक्के भरले असल्याने आनंदाचे वातावरण पसरले आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

यशवंत शिंदे यांची नेमबाजी स्पर्धेत सुवर्णपदकाला गवसणी! ४१ व्या महाराष्ट्र राज्य नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदकमाढा तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा

करमाळा प्रतिनिधी  निमगाव (टें.) येथील आदर्श सरपंच तथा विठ्ठल कॉर्पोरेशनचे कार्यकारी संचालक श्री. यशवंत संजयमामा…

5 hours ago

प्राचार्य बाळासाहेब नरारे यांना पुरी (ओडिशा) येथे ‘सुकुमारी स्वरमनी’ पुरस्काराने सन्मानित

करमाळा प्रतिनिधी करमाळा  येथील कमलाभवानी बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष तथा सुरताल संगीत विद्यालयाचे प्राचार्य श्री. बाळासाहेब…

10 hours ago

करमाळा शहरातील दगडी रोड येथील रहिवासी शारदा पिसे दुःखद निधन

करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील दगडी रोड येथील रहिवासी शारदा सुरेश पिसे (वय ७१) यांचे अल्पशा…

1 day ago

लोकशाही बचाव अराजकता हटाव सोलापूरच्या भाजप मोर्चाच्या नियोजनासाठी भाजप जिल्हा युवा नेते दिग्विजय बागल यांच्या उपस्थितीत करमाळ्यात १ नोव्हेंबरला बैठक- सचिन पिसाळ

करमाळा प्रतिनिधी काँग्रेस इंडी आघाडी आणि डाव्या पक्षांकडून भारतीय जनता पक्षाविरोधात खोटा प्रचार करून पक्षाची…

6 days ago

दुष्काळ व पाणीटंचाई संदर्भातील बैठक आमदार.नारायण (आबा)पाटील यांनी जेऊर येथे न घेता करमाळा येथे पंचायत समिती सभागृहात घ्यावी- ॲड. अजिनाथ विघ्ने उपसभापती पं.स.करमाळा

करमाळा प्रतिनिधी  करमाळा तालुक्याची दुष्काळ निवारण व पाणीटंचाई आढावा बैठक आमदार. नारायण( आबा) पाटील यांचे…

1 week ago

डॉ अजिंक्य पवार यांची एम.डी. परीक्षेत यशस्वी भरारी; जनरल मेडिसिनमध्ये पदव्युत्तर पदवी संपादन डॉ. रविकिरण पवार कुटुंबीयांचा अभिमान उंचावला सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव

करमाळा : प्रतिनिधी मेहनत, जिद्द, सातत्यपूर्ण अभ्यास आणि ध्येयाप्रती असलेल्या निष्ठेच्या जोरावर डॉ. अजिंक्य रविकिरण…

1 week ago